Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

Share Market Investment :  शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या वाईट दिवसांमध्ये आणखी एका वाईट दिवसाची भर पडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:41 IST2025-01-11T10:41:54+5:302025-01-11T10:41:54+5:30

Share Market Investment :  शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या वाईट दिवसांमध्ये आणखी एका वाईट दिवसाची भर पडली.

Investor s bad days are not going to stop 264 stocks including Tata Steel Coal India hit 52 Week Low | गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

Share Market Investment :  शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या वाईट दिवसांमध्ये आणखी एका वाईट दिवसाची भर पडली. शुक्रवारी प्रमुख आयटी शेअर्ससह इतर काही शेअर्स वगळता बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. या घसरणीत टाटा स्टील, कोल इंडिया, येस बँक, हीरो मोटोकॉर्प सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांसह २६४ कंपन्यांचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

१२ लाख कोटींचं नुकसान

शुक्रवारच्या घसरणीनंतर बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४३५.५ लाख कोटी रुपयांवरून ४३० लाख कोटी रुपयांवर आलं. म्हणजेच शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत शुक्रवारी सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण नोंदवण्यात आली असून या ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे १२ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. टाटा स्टील, कोल इंडिया, येस बँक, हीरो मोटोकॉर्प शिवाय आयआर, कॉनकॉर, एनएमडीसी, सेल, टाटा एलेक्सी, युनियन बँक यांसारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्सही ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

यामध्ये मोठी घसरण

शुक्रवारी सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक ४.४१ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट (३.५७ टक्के), एसबीआय (२.२६ टक्के), सन फार्मा (२.२५ टक्के), अॅक्सिस बँक (१.९५ टक्के), टाटा स्टील (१.८९ टक्के), पॉवरग्रिड (१.८० टक्के), अदानी पोर्ट्स (१.६७ टक्के), कोटक महिंद्रा बँक (१.६५ टक्के), टायटन (१.४० टक्के), एशियन पेंट्स (१.३१ टक्के), आयटीसी (१.१८ टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (१.१३ टक्के), आयसीआयसीआय बँक (१.१० टक्के), रिलायन्स इंडस्ट्रिज (१.०१ टक्के) घसरणीसह बंद झाले.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investor s bad days are not going to stop 264 stocks including Tata Steel Coal India hit 52 Week Low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.