Join us  

TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 3:04 PM

Tata Steel Share: टाटांच्या या कंपनीचे शेअर्स आज गुरुवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५ टक्क्यांची घसरण झाली आणि ते इंट्रा डे नीचांकी पातळीवर पोहोचलेत.

Tata Steel Share: टाटा स्टीलचे शेअर्स आज गुरुवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५ टक्क्यांची घसरण झाली आणि ते १६५.५० रुपयांच्या इंट्रा-डे लो वर पोहोचले आहेत. कंपनीच्या तिमाही निकालांच्या दुसऱ्या दिवशी शेअर्समध्ये ही घसरण झाली. मार्च तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात ६५ टक्क्यांची घसरण झाली. 

काय आहे डिटेल? 

मार्च २०२४ मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत टाटा स्टीलचा एकत्रित निव्वळ नफा ६४.५९ टक्क्यांनी घसरून ५५४.५६ कोटी रुपयांवर आला आहे. लो रिसिट्स आणि काही असामान्य बाबींमुळे आपला नफा कमी झाला असल्याचं कंपनीनं बुधवारी शेअर बाजारांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,५६६.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ६३,१३१.०८ कोटी रुपयांवरून कमी होऊन ५८,८६३.२२ कोटी रुपयांवर आलं आहे. तर कंपनीचा खर्च कमी होऊन ५६,४९६.८८ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी ५९,९१८.१५ कोटी रुपये होता. 

कंपनी देणार लाभांश 

कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी ३.६० रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. खासगी प्लेसमेंट तत्त्वावर नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) माध्यमातून ३,००० कोटी रुपये उभे करण्यासाठी एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये अतिरिक्त लोन सिक्युरिटी देण्यास ही बोर्डाने मान्यता दिली. 

काय म्हटलंय ब्रोकरेजनं? 

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजनं २०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह टाटा स्टीलला बाय रेटिंग दिलंय. तर दुसरीकडे मॉर्गन स्टॅनलीनं १३५ रुपयांच्या टार्गेट प्राईजसह टाटा स्टीलला इक्वल वेट रेटिंग दिलंय. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १७८ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १०५.६५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २,०८,५९८.३३ कोटी रुपये आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार