कल्याण ज्वेलर्स या सोन्याचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरची किमती आज 5.6 टक्क्यांनी वधारली. यानंतर कंपनीच्या शेअरने 188 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शेअरच्या किमतीत ही वाढ कंपनीच्या तिमाही निकालामुळे झाल्याचे मानले जात आहे.
नेट प्रॉफिटमध्ये वाढ -एप्रिल ते जून दरम्यान कल्याण ज्वेलर्सचा प्रॉफिट (टॅक्स भरल्यानंतरचा) 143 कोटी रुपये एवढा होता. जो एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 107 कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 31 टक्क्यांच्या वाढीसह 4387 कोटी रुपेय राहिला.
1 वर्षांत 157 टक्के परतावा -शेअर बाजारात कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत गेल्या केवळ एका वर्षातच तब्बल 158 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 3 महिन्यांचा विचार करता, पोझिशनल गुंतवणूकदारांना 75.61 टक्क्यांचा फायदा झाला आहे.
कंपनीचा खर्च वाढला - कल्याण ज्वेलर्सने ई-कॉमर्स सेक्शनमधून यावेळी 34 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. गेल्या वर्षाच्या जून तिमाहीत हा रेव्हेन्यू 44 कोटी रुपेय होता. एप्रिल ते जून 2023 दरम्यान कल्याण ज्वेलर्सचा एकूण खर्च 31 टक्क्यांनी वाढून 4198 कोटी रुपये झाला.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)