Tata Power share price: मार्च तिमाहीच्या निकालानंतर टाटाची कंपनी टाटा पॉवर (Tata Power) कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी व्यवहारादरम्यान हा शेअर ३ टक्क्यांनी घसरला आणि किंमत ४१९.५५ रुपयांवर आली. दरम्यान, जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सनं (Goldman Sachs) पुढील १२ महिन्यांत हा शेअर ४५ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ब्रोकरेज कंपनीनं टाटा पॉवरच्या शेअरवर 'सेल' रेटिंग दिले असून २४० रुपयांची शेअरचं टार्गेट प्राइस दिली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ७५ टक्के आणि गेल्या १२ महिन्यांत ११० टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
सीएलएसए टार्गेट प्राईज
आणखी एक ब्रोकिंग फर्म सीएलएसएनेही टाटा पॉवरला २९७ रुपयांच्या टार्गेट प्राईजसह विकण्याची करण्याची शिफारस केली आहे. हा शेअर त्याच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या कमाईच्या अंदाजापेक्षा ३५ पट महाग आहे. कंपनीच्या निकालांची गुणवत्ता आव्हानात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
टाटा पॉवरवर कव्हरेज करणाऱ्या २१ विश्लेषकांपैकी आठ विश्लेषकांचे 'बाय' रेटिंग दिलं आहे. तर तिघांनी 'होल्ड' करण्याचा सल्ला दिलाय. याशिवाय इतर १० विश्लेषकांनी हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हा शेअर सध्याच्या पातळीवरून २० टक्क्यांनी घसरू शकतो.
मार्च तिमाहीचे निकाल कसे होते?
मार्च तिमाहीत टाटा समूहाच्या कंपनीचा निव्वळ नफा ११ टक्क्यांनी वाढून १,०४६ कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९३९ कोटी रुपये होता. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल २७ टक्क्यांनी वाढून १५,८४६.५० कोटी रुपये झाला आहे. टाटा पॉवरच्या संचालक मंडळानं १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर प्रति शेअर २ रुपये (२०० टक्के) अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांश देण्यासाठी कंपनीने ४ जुलै २०२४ ही तारीख निश्चित केली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)