Join us

एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, सातत्यानं अपर सर्किट; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 2:03 PM

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार दिसून येत आहेत. पण अशात काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना नफाही मिळवून दिलाय.

Gensol Engineering Ltd share price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढ उतार दिसून येत आहेत. पण अशात काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना नफाही मिळवून दिलाय. जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या (Gensol Engineering Ltd) शेअरला सातत्यानं 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागत आहे. जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचे शेअर आता 881.20 रुपयांवर पोहोचले आहेत.  

गेल्या तीन ट्रेडिंग दिवसांपासून या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे आणि या कालावधीत हा शेअर 15.5% वाढला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक मोठं कारण आहे. वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सोलर पॅनल एनर्जी स्कीम आणली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स चर्चेत आहेत. जेनसोल इंजिनिअरिंग सोलर एनर्जी इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) सेवा व्यवसायात सक्रिय आहे. कंपनीने अलीकडेच गुजरातमधील भावनगर येथे कॉन्टिन्युम ग्रीन एनर्जीसाठी करार केला आहे. 

काय आहे शेअर्सची स्थिती? 

गेल्या पाच दिवसांत जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, एका महिन्यात या शेअरच्या किंमतीत 33% आणि गेल्या सहा महिन्यांत 53% नी घसरण झाली आहे. YTD मध्या हा शेअर 4 टक्क्यांनी वाढला आहे. शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,377.10 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 283.38 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप 3,340.77 कोटी रुपये आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा