Lokmat Money >शेअर बाजार > रेखा झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीचा आहे जबरदस्त प्लॅन

रेखा झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीचा आहे जबरदस्त प्लॅन

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी उत्तम रिटर्न दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 03:34 PM2024-01-12T15:34:03+5:302024-01-12T15:36:15+5:30

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी उत्तम रिटर्न दिले आहेत.

Investors buying Rekha Jhunjhunwala s favorite stock nazara technologies the company has a formidable plan | रेखा झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीचा आहे जबरदस्त प्लॅन

रेखा झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीचा आहे जबरदस्त प्लॅन

Nazara Technologies share: दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी उत्तम रिटर्न दिले आहेत. त्यापैकीच एक नझारा टेक्नॉलॉजीचा आहे. शुक्रवारी इंट्रा-डे मध्ये कंपनीचा शेअर ९७४.८० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. मार्च २०२३ मध्ये कंपनीचा शेअर ४८१.९५ रुपयांपर्यंत आला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.

कंपनीबाबत माहिती

नझारा टेक्नॉलॉजी एक गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्याचं मुख्यालय भारतात असलं तर कंपनीची उपस्थइती आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेसारख्या जागतिक बाजारपेठांमध्येही आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इंटरॅक्टिव्ह गेमिंग, इस्पोर्ट्स, एडटेक इकोसिस्टमचा समावेश आहे. दुसऱ्या पॉप्युलर सेगमेंटमध्ये किडोपिया आणि अॅनिमल जॅन जो गेमिफाईड अर्ली लर्निंग, वर्ल्ड क्रिकेट चॅम्पिअनशिप सामील आहे.

कोणाची गुंतवणूक?

सप्टेंबर तिमाहीदरम्यान नझारा टेक्नॉलॉजीमध्ये झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ आणि एसबीआय म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूकदारांकडून ५१० कोटींचं फंडींग मिळवलं. यामध्ये रेखा झुनझुनवाला यांचीदेखील गुंतवणूक आहे. कंपनीत त्यांनी ६५८८६२० शेअर्स म्हणजेच ९ टक्के हिस्सा खरेदी केलाय.

कंपनीचं भविष्य

संपादन संधींचा लाभ घेण्यासाठी आणि येत्या काही वर्षांमध्ये आमच्या वाढीला गती देण्यासाठी मजबूत स्थितीत आहोत, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. नझारानं  आर्थिक वर्ष २०२३ च्या वार्षिक अहवालात म्हटलंय की, भारतातील गेमर्सची संख्या जसजशी वाढत आहे, त्यामुळे उद्योगाच्या वाढीला आणखी वेग येईल. कंपनीचं आपले बाजारातील नेतृत्व टिकवून ठेवण्याचं आणि भारतीय मोबाइल गेम्स उद्योगातील अफाट वाढीच्या क्षमतेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे.


(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investors buying Rekha Jhunjhunwala s favorite stock nazara technologies the company has a formidable plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.