Join us  

सोलर कंपनीच्या शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार; चार दिवसांत २४६% वाढ, ₹११५ वर आलेला IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:05 PM

सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यापासून सातत्यानं फोकसमध्ये आहेत.

Alpex Solar share price: सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अल्पेक्स सोलरचे शेअर्स लिस्टिंग झाल्यापासून सातत्यानं फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अल्पेक्स सोलरच्या शेअरमध्ये मंगळवारी 5 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली असून ते 398.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. शेअर्स लिस्ट झाल्यापासून चार ट्रेडिंग सत्रांमध्ये यात 246.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

15 फेब्रुवारीला झालेलं लिस्टिंग 

कंपनीनं गुरुवारी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. हा आयपीओ NSE SME मध्ये 329 रुपयांवर 186 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला होता. कंपनीची इश्यू प्राईज 109 ते 115 रुपये प्रति शेअर होती. 

324 पट सबस्क्राईब झालेला आयपीओ 

अल्पेक्स सोलरचा आयपीओ एकूण 324.03 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत आयपीओ 351.89 पट सबस्क्राईब झाला होता. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सच्या (NII) श्रेणीमध्ये 502.31 पट तर, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा (QIB) 141.48 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये 1 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,38,000 रुपये गुंतवावे लागणार होते. अल्पेक्स सोलरच्या सार्वजनिक इश्यूचा एकूण आकार 74.52 कोटी रुपयांपर्यंत होता. आयपीओपूर्वी, अल्पेक्स सोलारमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 93.53 टक्के होता, जो आता 68.76 टक्क्यांवर आला आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार