शेअर बाजारातील श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेडच्या (Srestha Finvest) शेअर्समध्ये आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान जबरदस्त तेजी दिसत आहे. मार्च 2024 दरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 1.04 रुपयांवर होता. तर नव्या आर्थिक वर्षात तो 1.87 रुपयांवर पोहोचला. अर्थात या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 45 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
लाइफ टाइम उच्चांकावर -शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.82 रुपयांवर खुला जाला. तसेच कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 1.87 रुपये आहे. या तेजीनंतर हा शेअर आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे.
असा आहे शेअरचा इतिहास -एक महिन्यापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत 1.17 रुपयांच्या पातळीवर होता. तो आता 1.87 रुपयांवर आहे. अर्थात, या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 55 टक्क्यांनी वधारली आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरचा भाव 1.31 रुपयांवरून 1.87 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या वर्षात हा शेअर 40 टक्क्यांनी वधारला आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
100 टक्के वाटा जनतेचा -Trendlyen च्या डेटानुसार, कंपनीमध्ये जनतेचा एकूण वाटा 100 टक्के एवढा आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्स, म्युच्युअल फंड्स आणि FII चा वाटा शून्य आहे. महत्वाचे म्हणजे, लोकांमध्ये सर्वाधिक वाटा अम्बाश्री डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. या कंपनीकडे 4.3 टक्के एवढा वाटा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)