Join us  

IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किंमत ₹१०० पेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 2:15 PM

कंपनीचा आयपीओ 13 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. हा IPO पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात 100 टक्के सबस्क्राइब झाला.

IPO News: प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्सचा आयपीओ (Pratham EPC Projects IPO) आजपासून म्हणजेच 11 मार्चपासून खुला झाला आहे. कंपनीचा आयपीओ 13 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. हा IPO पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात 100 टक्के सबस्क्राइब झाला. कंपनीच्या IPO चा प्राइस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. 

12.55 मिनिटांपर्यंतच्या आकडेवारीनुसार, प्रथम ईपीसी आयपीओ 4.32 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल श्रेणीमध्ये, आयपीओला सर्वाधिक 7.44 पट सबस्क्रिप्शन मिळालं. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स श्रेणीमध्ये कोणतेही सबसक्रिप्शन मिळालं नव्हतं. तर नॉन-इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सच्या श्रेणीमध्ये 2.82 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. 

किती आहे लॉट साईज?  

कंपनीच्या आयपीओची लॉट साइज 1600 शेअर्सची आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आयपीओ 7 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होता. त्यानंतर कंपनीनं 10.25 कोटी रुपये उभे केले होते.  

या एसएमई आयपीओची साईज 36 कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे 48 लाख फ्रेश शेअर इश्यू करणार आहे. कंपनीतर्फे 14 मार्च रोजी शेअर्सचे वाटप केलं जाईल. 

ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती? 

इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आयपीओ सध्या 96 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. ही किंमत आयपीओच्या प्राइस बँडपेक्षा अधिक आहे. जर हा ट्रेंड लिस्टिंग होईपर्यंत चालू राहिला तर आयपीओ पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून देऊ शकतो. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार