आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्यामुळे गुरुवारी, 16 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये 306 अंकांनी वाढ झाली. तर निफ्टी 19,750 च्या पुढे पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 1.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही प्रत्येकी अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह बंद झाले.
आजच्या व्यवहारात आयटी शेअर्स व्यतिरिक्त कन्झ्युमर ड्युरेबल्स, रियल्टी, ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. व्यवहाराच्या अखेरिस, बीएसई सेन्सेक्स 306.55 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 65,982.48 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 89.75 अंकांच्या किंवा 0.46 टक्क्यांच्या उसळीसह 19,765.20 च्या पातळीवर बंद झाला.
कमावले 1.66 लाख कोटी
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 327.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी 325.40 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.66 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आयटी शेअर्समध्ये तुफान तेजीनं गुंतवणूकदार मालामाल, एका दिवसात कमावले ₹१.६६ लाख कोटी
, 16 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 04:47 PM2023-11-16T16:47:05+5:302023-11-16T16:47:12+5:30