Lokmat Money >शेअर बाजार > ३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 01:05 PM2023-01-08T13:05:38+5:302023-01-08T13:05:59+5:30

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला.

Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips | ३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचा आयपीओ डिसेंबर महिन्यातच आला होता. त्याचा प्राईस बँड 30 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला होता. यानंतर कंपनीचे शेअर्स जवळजवळ 100 टक्क्यांच्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाले. या SME स्टॉकच्या शेअर्समधील तेजी केवळ लिस्टिंगच्या दिवशीच संपली नाही. तर ज्वेलरी कंपनीचा हा आयपीओ लिस्टिंग झाल्यानंतर महिनाभरात मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरीचा शेअर हा अशा शेअर्सपैकी एक आहे ज्याने अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी ही फॅशन ज्वेलरी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली होती.

या फॅशन ज्वेलरी कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर 2022 रोजी बंद झाला. हा आयपीओ 230.94 पट सबस्क्राइब झाला, तर याचा रिटेल हिस्सा 248.68 टक्के सबस्क्राईब झाला होता. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई एक्सचेंजमध्ये 20 डिसेंबर 2022 रोजी 57 रुपये प्रति शेअर या किमतीने सूचीबद्ध झाले. ज्वेलरी कंपनीचा शेअर लिस्टिंगच्या दिवशीच 59.85 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के प्रीमिअम लिस्टिंग मिळाले.

गुंतवणूकदार मालामाल
नव्या वर्षाच्या सुरुवातीनंतर 2023 मध्ये कंपनीनं सर्व पाच ट्रेडिंग सेशनमध्ये अपर सर्किट हिट केले. लिस्टिंगनंतर एखाद्यानं यात पैसे गुंतवले असते तर त्याचे पैसे दुप्पट झाले असते. कंपनीचा शेअर एखा महिन्यात 57 रुपयांनी वाढून 129.35 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच गुंतवणूकदारांना महिन्याभरापेक्षाही कमी कालावधीत 115 टक्क्यांचा नफा झाला.

(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.