Lokmat Money >शेअर बाजार > Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा

Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा

नेटवेब टेक्नॉलॉजीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:42 PM2023-07-27T12:42:56+5:302023-07-27T12:43:14+5:30

नेटवेब टेक्नॉलॉजीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

Investors in Netweb Technologies IPO 88 profit early on share market listing bse nse money | Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा

Netweb Technologies च्या IPO मध्ये पैसे लावणारे मालामाल, सुरुवातीलाच ८८% नफा

Netweb Technologies IPO : नेटवेब टेक्नॉलॉजीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. या आयपीओची शेअर बाजारात गुरुवारी बंपर लिस्टिंग झाली. नेटवेब शेअर बीएसईवर 88.50 टक्के किंवा 442.50 रुपयांच्या प्रीमियमसह 942.50 रुपयांवर सूचीबद्ध आहे. नेटवेब टेक्नॉलॉजी कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाली. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीला 46.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल 445.65 कोटी रुपये होता.

नेटवेब टेक्नॉलॉजीच्या शेअर्सच्या बंपर लिस्टनंतर या शेअरमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. लोक लिस्टिंग गेनवर नफा वसूली करताना दिसले. सकाळी 10.20 वाजता, बीएसईवर शेअर 6.76 टक्क्यांनी किंवा 63.70 रुपयांनी घसरून 878.80 रुपयांवर व्यवहार करत होता. अशा प्रकारे, आयपीओतील गुंतवणूकदारांचा परतावा 75.76 टक्क्यांवर आला. सध्या बीएसईवर कंपनीचं मार्केट कॅप 4,930.63 कोटी रुपये आहे.

475-500 रुपये प्राईज बँड
नेटवेब टेक्नॉलॉजीचा आयपीओ 17 जुलै ते 19 जुलै दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हा आयपीओ 101 पट सबस्क्राइब झाला. कंपनीनं स्टॉकची किंमत 475 रुपये ते 500 रुपये निश्चित केली होती. ही कंपनी हाय एंड कम्युटिंग सोल्यूशन्स प्रदान करते. त्यांनी बनवलेला कम्प्युटर 11 वेळा जगातील अव्वल सुपर कॉम्प्युटर म्हणून निवडला गेलाय.

Web Title: Investors in Netweb Technologies IPO 88 profit early on share market listing bse nse money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.