Lokmat Money >शेअर बाजार > लिस्ट होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; खरेदीसाठी झुंबड; २६ टक्क्यांची झाली वाढ

लिस्ट होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; खरेदीसाठी झुंबड; २६ टक्क्यांची झाली वाढ

Aeron Composite share: आयपीओच्या यशस्वी सब्सक्रिप्शननंतर या कंपनीच्या शेअर्सनं एनएसई एसएमईवर २५ रुपये किंवा २० टक्क्यांच्या प्रीमियमसह बुधवारी जबरदस्त एन्ट्री घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:26 PM2024-09-04T13:26:52+5:302024-09-04T13:27:55+5:30

Aeron Composite share: आयपीओच्या यशस्वी सब्सक्रिप्शननंतर या कंपनीच्या शेअर्सनं एनएसई एसएमईवर २५ रुपये किंवा २० टक्क्यांच्या प्रीमियमसह बुधवारी जबरदस्त एन्ट्री घेतली.

Investors jump on Aeron Composite share as soon as it is listed people jumps to buy There has been an increase of 26 percent | लिस्ट होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; खरेदीसाठी झुंबड; २६ टक्क्यांची झाली वाढ

लिस्ट होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; खरेदीसाठी झुंबड; २६ टक्क्यांची झाली वाढ

Aeron Composite share: आयपीओच्या यशस्वी सब्सक्रिप्शननंतर या कंपनीच्या शेअर्सनं एनएसई एसएमईवर २५ रुपये किंवा २० टक्क्यांच्या प्रीमियमसह बुधवारी जबरदस्त एन्ट्री घेतली. एरॉन कम्पोझिटच्या शेअरची किंमत १२५ रुपयांच्या आयपीओच्या तुलनेत १५० रुपयांवर खुली झाली. लिस्टिंगनंतर हा शेअर २६ टक्क्यांनी वधारला आणि १५७.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

मिळालेला जबरदस्त प्रतिसाद

कंपनीचा आयपीओ सुमारे ४१ पट सब्सक्राइब झाला. २८.३६ लाख शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ११.६ कोटी शेअर्ससाठी बोली लागली. रिटेल हिस्सा सुमारे ३४ पट सब्सक्राइब करण्यात आला आणि १४.२ लाख शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत सुमारे ४.८ कोटी शेअर्ससाठी बोली लागली.

५६.१० कोटी रुपयांचा एरॉन कम्पोझिटचा आयपीओ बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी बंद झाला. इश्यूसाठी प्राइस बँड १२१ ते १२५ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. त्यात ४४.८८ लाख शेअर्सचे फ्रेश इश्यू होते. कंपनीनं १२५ रुपये प्रति शेअर दरानं १२,१४,००० इक्विटी शेअर्सचं वाटप करून अँकर गुंतवणूकदारांकडून १५.१७ कोटी रुपये उभे केले होते.

कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभी केलेली रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी आणि अतिरिक्त उत्पादन युनिट्स स्थापित करण्यासाठी करेल. ही कंपनी फायबरग्लास पॉलिमर (एफआरपी) उत्पादनांची निर्मिती आणि वितरण करते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: Investors jump on Aeron Composite share as soon as it is listed people jumps to buy There has been an increase of 26 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.