Lokmat Money >शेअर बाजार > 'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स

'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स

Orient Technologies IPO: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बंद झाला आहे. या आयपीओला १५१ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळाल्याची माहिती समोर आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:13 PM2024-08-24T15:13:45+5:302024-08-24T15:14:10+5:30

Orient Technologies IPO: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बंद झाला आहे. या आयपीओला १५१ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळाल्याची माहिती समोर आलीये.

Investors jump on Orient Technologies IPO Investors are getting strong response in gray market know details | 'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स

'या' IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स

Orient Technologies IPO: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बंद झाला आहे. या आयपीओला १५१ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळाल्याची माहिती समोर आलीये. लिस्टिंगपूर्वी या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हा आयपीओची २८ ऑगस्ट रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.

कसा होता प्रतिसाद?

एनएसईच्या आकडेवारीनुसार, २१५ कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या शेअर्स विक्रीत ७४,४९,८४६ समभागांच्या ऑफरच्या तुलनेत १,१३,०२,२०,६४८ शेअर्ससाठी बोली लागली होती. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (एनआयआय) हिस्सा ३००.६० पट, तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) हिस्सा १८९.९० पट सब्सक्राइब झाला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा (आरआयआय) हिस्सा ६६.८७ पट सब्सक्राइब झाला.

ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय?

ओरिएंट टेक्नॉलॉजीज आयओपीसाठी इश्यू प्राइस १९५ ते २०६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होती. ग्रे मार्केट प्रीमियम ८२ रुपये म्हणजेच ४०% आहे. या पार्श्वभूमीवर आयपीओची लिस्टिंग २८८ रुपयांवर होण्याची शक्यता आहे.

१२० कोटींचे नवे शेअर्स

या आयपीओमध्ये १२० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी करणं आणि प्रवर्तकांनी इश्यूच्या अपर लेव्हलवर प्रत्येकी ९५ कोटी रुपयांचे ४६ लाख इक्विटी शेअर्स विकण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आयपीओचा एकूण आकार २१५ कोटी रुपये आहे. अजय बळीराम सावंत, उमेश नवनीतलाल शहा, उज्ज्वल अरविंद म्हात्रे, जयेश मनहरलाल शहा हे कंपनीचे शेअर्स ओएफएसअंतर्गत विकत आहेत.

आर्थिक स्थिती कशी?

ओरिएंट टेक्नॉलॉजीजचे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ऑपरेटिंग उत्पन्न २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ५३५.१० कोटी रुपयांवरून ६०२.८९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा ४१.४५ कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षात ३८.३- कोटी रुपये होता.

कंपनी बद्दल

ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडची स्थापना जुलै १९९७ मध्ये झाली. ही कंपनी तेजीनं वाढणारी आयटी सोल्युशन प्रोव्हायडर आहे. याचं मुख्यालय मुंबई येथे आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title: Investors jump on Orient Technologies IPO Investors are getting strong response in gray market know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.