Join us  

SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 6:00 PM

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअरमध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाली. यादरम्यान, शेअरनं ५२ उच्चांकी स्तरालाही स्पर्श केला.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअरमध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या शेअरनं ८२९.९० रुपयांचा उच्चांक गाठला. हा शेअर एका दिवसाच्या तुलनेत १.५९ टक्क्यांनी घसरून बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर ८३१ रुपयांच्या भावावर पोहोचला. ३ जून २०२४ रोजी हा शेअर ९१२.१० रुपयांवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हा शेअर ५४३.१५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. 

मूल्यांकनाच्या बाबतीत एसबीआय खासगी क्षेत्रातील काही बँकांच्या जवळ जात आहे. ब्रोकरेज कंपनी जेएम फायनान्शियलनं पीएसयू बँकांसाठी कर्जाबाबतची चिंता अजूनही एक प्रमुख चर्चेचा विषय असल्याचं म्हटलं. कर्जाच्या मागणीत सुधारणा एसबीआयला नजीकच्या काळात क्रेडिट ग्रोथ देण्यास मदत करेल, असंही त्यांनी म्हटलंय. ब्रोकरेज कंपनीनं शेअरसाठी १०५० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. यासोबतच शेअरवर आपलं बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. 

एसबीआय ही नोमुराची पहिली पसंती आहे. तसंच या शेअरवर त्यांनी १००० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. ब्रोकरेजनं एसबीआयसाठी २०२५ आणि २०२६ या आर्थिक वर्षाच्या कमाईच्या अंदाजात १५ टक्क्यांची वाढ केली आणि याच कालावधीसाठी क्रेडिट कॉस्टचा अंदाज ०.५५% वरून ०.४ टक्क्यांपर्यंत कमी केला. 

कसे होते तिमाही निकाल? 

मार्च तिमाहीत एसबीआयला 20,698.35 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो उच्च व्याज उत्पन्न आणि कमी तरतुदींमुळे 24 टक्क्यांनी वाढलाय. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत बँकेला १६,६९४.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेच्या संचालक मंडळानं ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १३.७० रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूक