Lokmat Money >शेअर बाजार > सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

गेल्या दोन दिवसांपासून आयडीबीआय बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ दिसून आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 02:02 PM2023-09-05T14:02:54+5:302023-09-05T14:04:33+5:30

गेल्या दोन दिवसांपासून आयडीबीआय बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ दिसून आलीये.

Investors jump on shares as government and LIC prepare to sell stake in idbi bank bse nse investment | सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

गेल्या दोन दिवसांपासून आयडीबीआय बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ दिसून आलीये. एका वृत्तामुळे आयडीबीआय बँकेच्या शेअरमध्ये ही वाढ दिसून आलीये. बँकेच्या निर्गुंतवणुकीसाठी असेट व्हॅल्युअर नियुक्त करण्यासाठी सरकारने निविदा मागवल्या आहेत. या वृत्तामुळे बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मंगळवारी IDBI चे शेअर्स 71.25 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचले होते. 2018 नंतर कंपनीच्या शेअर्सची ही उच्चांकी पातळी आहे. 

काय आहे प्रकरण?
सरकार आणि एलआयसी आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. यासाठी असेट व्हॅल्यूअरसाठी निविदा मागवण्यात आल्यात. याच संस्थेवर आयडीबीआय बँकेच्या व्हॅल्युएशनची जबाबदारी असेल. कंपनी बँक असेट्सचं मूल्यांकन करून सर्व माहिती उपलब्ध करून देईल. बोली प्रक्रियेची अखेरची तारीख 9 ऑक्टोबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. 

शेअर्समध्ये तुफान तेजी (IDBI Bank share)
मंगळवारी आयडीबीआय बँकेचे शेअर्स बीएसईवर 65.21 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. बँकेचा इंट्रा डे हाय 71.25 रुपयांचा आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आज 9 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. आयडीबीआय बँकेच्या पोझिशनल गुंतवणूकदारांसाठी गेले २ दिवस चांगले ठरले आहेत. यादरम्यान बँकेच्या शेअर्सची किंमतीत 18 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investors jump on shares as government and LIC prepare to sell stake in idbi bank bse nse investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.