IdeaForge IPO Live: दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसची गुंतवणूक असलेली कंपनी IdeaForge च्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. हा आयपीओ पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राईब झाला. रिपोर्ट्नुसार IdeaForge आयपीओ दुपारी २ वाजेपर्यंत २.१५ पट सबस्क्राईब झाला होता. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २९ जूनपर्यंत खुला राहणार आहे.
IdeaForge चा आयपीओ आज खुला झाला. पहिल्याच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत रिटेल कॅटेगरीत आयपीओला ८.२९ पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल कॅटेगरीत २.३१ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे.
ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा जीएमपी ५०० रुपयांच्या पुढए गेला आहे. टॉप शेअर ब्रोकरच्या रिपोर्टनुसार हा आयपीओ आज ग्रे मार्केटमध्ये ५२० रुपयांवर उपलब्ध होता. जर हा ट्रेंड असाच कायम राहिला तर याची लिस्टिंग १२०० रुपयांच्या जवळ असू शकते. IdeaForge चं प्राईज बँड ६३८ ते ६७२ रुपये प्रति शेअर आहे.
(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)