Join us  

₹६ च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अंतराळ विभागाकडून मोठी ऑर्डर, सतत लागतंय अप्पर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 2:14 PM

Vama Industries Ltd Share: या कंपनीचे शेअर्स आज, मंगळवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. गेल्या अनेक सत्रांपासून कंपनीचा शेअर सातत्यानं अपर सर्किटवर धडकत आहे.

Vama Industries Ltd Share: वामा इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स आज, मंगळवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. गेल्या अनेक सत्रांपासून कंपनीचा शेअर सातत्यानं अपर सर्किटवर धडकत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये ४५ टक्क्यांची वाढ झाली. वामा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरनं आज ५ टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला आणि इंट्राडे उच्चांकी स्तर ६.९४ रुपयांवर पोहोचला. 

शेअर्समधील या तेजीमागे मोठी ऑर्डर आहे. प्रत्यक्षात कंपनीला अंतराळ विभागाकडून कोट्यवधींची ऑर्डर मिळाली आहे. वामा इंडस्ट्रीज लिमिटेड इंजिनिअरिंग डिझाइन आणि विकास सेवा तसंच आयटी सेवांमध्ये एक्सपर्ट आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३६.४६ कोटी रुपये आहे.

काय आहेत डिटेल्स?

कंपनीच्या एक्स्चेंज फाइलिंगनुसार, वामा इंडस्ट्रीज लिमिटेडला भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) कडून ७४.३२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. टर्नकी तत्त्वावर सेंट्रल आर्काइव्ह फॅसिलिटी (सीएएफ) सोल्यूशनला स्टोरेज मॅनेजमेंट (एचएसएम) प्रणाली आणि सर्व्हर पुरविण्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे.

काय करते कंपनी?

वामा इंडस्ट्रीज लिमिटेड ही हैदराबादस्थित कंपनी आहे. आयटी सर्व्हिसेस, इंजिनीअरिंग सर्व्हिसेस आणि आयटी इन्फ्रा सोल्युशन्समध्ये ती सक्रिय आहे. कंपनी आयटी कन्सल्टिंग, इंजिनीअरिंग डिझाइन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाऊड टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट डिझाइन आणि डेटा सेंटर इम्प्लीमेंटेशन सह अनेक सेवा पुरवते. डब्ल्यूएएमए वर्कस्टेशन, सर्व्हर, नोटबुक, इंटिग्रेटेड सिस्टम आणि कम्प्युटर पेसिफेरल्ससह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचंही मार्केटिंग करते. वामा इंडस्ट्रीजला कम्प्युटर, बाह्य उपकरणं आणि सॉफ्टवेअरच्या विक्रीतून सुमारे ५५ टक्के, वार्षिक देखभाल करार सेवांमधून २८ टक्के, सल्लागार सेवांमधून ३ टक्के, आयटी अभियांत्रिकी सेवांमधून ११ टक्के आणि इतर उत्पन्नातून ३ टक्के उत्पन्न मिळतं.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक