Join us

IREDA : एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ८५० टक्क्यांनी वधारला; ₹३०० पार पोहोचली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:42 PM

IREDA : बीएसईवरील इंट्राडे व्यवहारात ७ टक्क्यांनी वधारल्यानंतर इरेडाच्या शेअरची किंमत प्रथमच ३०० रुपयांच्या ओलांडून ३०४.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Ireda shares rally today: इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (Indian Renewable Energy Development Agency) शेअर्सनं शुक्रवारी १२ जुलै रोजी नवा उच्चांक गाठला. बीएसईवरील इंट्राडे व्यवहारात ७ टक्क्यांनी वधारल्यानंतर इरेडाच्या शेअरची किंमत प्रथमच ३०० रुपयांच्या ओलांडून ३०४.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. इरेडाच्या शेअरमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

इरेडाच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक मोठं कारण आहे. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचं कंपनीचं लेखापरीक्षण केलेले आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची आज बैठक होणार आहे. इरेडाचा शेअर गेल्या महिन्याच्या ४ जूनच्या नीचांकी १५४ रुपयांच्या तुलनेत ९७ टक्क्यांनी वधारला आहे. इरेडाच्या शेअरची किंमत ३२ रुपये प्रति शेअरच्या इश्यू प्राइसवरून ८५० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे शेअर्स २९ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले होते.

२५ हजार कोटींच्या कर्जाचं वाटप

इरेडानं २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३७,३५४ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून २५,०८९ कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं आहे. इरेडाच्या निवेदनानुसार, कंपनीच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सीएमडींनी मार्च तिमाहीअखेर निव्वळ संपत्ती ८,५५९ कोटी रुपये होती. इरेडानं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३७,३५४ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वोच्च कर्ज मंजुरी आणि २५,०८९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक