Veritaas Advertising IPO: व्हेरिटास अॅडव्हर्टायझिंगचे शेअर्स मंगळवारी एनएसईवर लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. व्हेरिटास अॅडव्हर्टायझिंगचे शेअर्स आज २७५ रुपयांवर लिस्ट झाले, जे ११४ रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडपेक्षा १४४ टक्क्यांनी अधिक प्रीमियम आहे. लिस्टिंगनंतर शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि तो २८८.७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
व्हेरिटास अॅडव्हर्टायझिंगचा आयपीओ १३ मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला. गुंतवणूकदार या इश्यूमध्ये १५ मे पर्यंत गुंतवणूक करता येणार होती. या आयपीओची साईज ८.४८ कोटी रुपये आहे. या तीन दिवसांमध्ये या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत हा आयपीओ ६२१.६२ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ९८९.४४ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत हा आयपीओ ६२९.५६ पट सबस्क्राईब झाला होता. याव्यतिरिक्त, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स श्रेणीतही आयपीओ १०२.४१ पट सब्सक्राइब झाला.
कंपनीबद्दल माहिती
२०१८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी एक फुल सर्व्हिस अॅड एजन्सी आहे. ही कंपनी अनेक प्लॅटफॉर्मवर ३६० डिग्री मार्केटिंग सोल्युशन्सची डिटेलचेन प्रदान करते. कंपनीची पश्चिम बंगाल, गुवाहाटी आणि शिलाँग उपस्थिती आहे. आयपीओच्या रकमेतून कंपनी पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दिल्लीत नवीन पोलिस बूथ उभारणार असून कोलकाता, मुंबई आणि पुणे येथे ट्रॅफिक सिग्नल डिस्प्ले असलेले पोल किऑस्क उभारणार आहे. याव्यतिरिक्त, उत्पन्नाचा एक भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठीही या रकमेचा वापर केला जाणार आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)