Lokmat Money >शेअर बाजार > ₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट

₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट

कंपनीच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लगले. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर सॅजिलिटी इंडियाचा शेअर 9.58 टक्क्यांच्या तेजीसह 34.54 रुपयांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:59 AM2024-11-28T00:59:19+5:302024-11-28T00:59:58+5:30

कंपनीच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लगले. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर सॅजिलिटी इंडियाचा शेअर 9.58 टक्क्यांच्या तेजीसह 34.54 रुपयांवर बंद झाला.

Investors rush to buy a sagility india share of ra 35, the upper circuit continued on the second day as well | ₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट

₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट

शेअर बाजारात सॅजिलिटी इंडियाचे शेअर (Sagility India) आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लगले. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर सॅजिलिटी इंडियाचा शेअर 9.58 टक्क्यांच्या तेजीसह 34.54 रुपयांवर बंद झाला.

गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 17.91 टक्क्यांची तेजी आली आहे. चालू आर्थिक वर्षात 2024-25 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 236 टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 117.34 कोटी रुपये एवढा राहिला आहे. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 34.96 कोटी रुपयांचा रिहिला.

3.20 पट सब्सक्राइब झाला होता आयपीओ -
सॅजिलिटी इंडिया लिमिटेडचा आयपीओ तीन दिवसांत 3.20 पट सब्सक्राइब झाला होता. हा आयपीओ पूर्णपणे 70.22 कोटी शेअर्सच्या ओएफएसवर बेस्ड होता. कंपनीने 28-30 रुपये प्रति शेअर एवढा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 5 नोव्हेंबरला खुला झाला होता आणि 7 नोव्हेंबर, 2024 ला बंद झाला होता.

कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 12 नोव्हेंबर, 2024 रोजी झाली होती. कंपनीचे शेअर 2.3 टक्क्यांच्या घसरणीसह लिस्ट झाला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)


 

Web Title: Investors rush to buy a sagility india share of ra 35, the upper circuit continued on the second day as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.