शेअर बाजारातील पेनी स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचा (Standard Capital Markets Ltd) शेअर आज 5% पर्यंत वधारला आहे. यानंतर, हा शेअर 1.58 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला आहे. खरे तर, एका बातमीमुळे ही तेजी दिसत आहे. कंपनीच्या बोर्ड मेंबर्सनी निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे आज या शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, हा स्मॉल-कॅप स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने मल्टीबॅगर परतावा देत आहे.
अशी आहे शेअरची स्थिती -
या शेअरची किंमत केवळ एका महिन्यातच ₹1.53 ने वाढून ₹1.58 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत हा शेअर 3.50 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सचा शेअर ₹0.27 वरून ₹1.58 पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये जवळफास 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षाचा विचार करता, या शेअरने गेल्या एका वर्षात तब्बल 775 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर 18 पैशांवरून सध्याच्या पातळीवर पोहोचला आहे.
आज शुक्रवारी गा मल्टीबॅगर पेनी स्टॉक बीएसईवर ₹1.57 प्रति शेअरवर खुला झाला होता आणि त्याने ₹1.58 प्रति शेअरच्या इंट्राडे हायला स्पर्श केला आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3.52 रुपये तर नीचांक 1.15 रुपये एढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 232.26 कोटी रुपये एढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)