Lokmat Money >शेअर बाजार > ₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर

₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर

या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या 8.82 रुपये या नीचांकाचा विचार करता 300 टक्क्यांहून अधिकचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:58 PM2024-08-30T16:58:00+5:302024-08-30T16:58:32+5:30

या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या 8.82 रुपये या नीचांकाचा विचार करता 300 टक्क्यांहून अधिकचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

investors rush to buy ₹35 cellecor gadgets limited share company gets big orders | ₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर

₹35 च्या शेअरची कमाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, कंपनीला मिळालीये मोठी ऑर्डर

शेअर बाजारातील सेलेकॉर गॅझेट्स लिमिटेडचे शेअर शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. हा शेअर आज 4.5 टक्क्यांनी वधारून 35.60 रुपये प्रति शेअरवर पोहोचला. हा शेअर गुरुवारी 34.05 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या 8.82 रुपये या नीचांकाचा विचार करता 300 टक्क्यांहून अधिकचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

काय करते कंपनी? -
सेलेकोर गॅझेट्स लिमिटेडची स्थापना 2010 मध्ये झाली होती. ही एक भारतीय कंपनी आहे. जी स्वतःच्या नावाने ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करते. यात, स्मार्ट टीव्ही, मोबाइल फोन, स्मार्टवॉच, इअरफोन आदी विविध उपकरणांसाठी परवडणारे पर्याय उपलब्ध करून देण्यावर फोकस करते. सेलेकॉर हे प्रोडक्ट्स 28 भारतीय राज्यांत 900 हून अधिक वितरक, 25,000 किरकोळ विक्रेते आणि 1200 सेवा केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमाने वितरित करते. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये त्यांची चांगली उपस्थिती आहे.  

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची एक प्रमुख कंपनी सेलेकॉर गॅझेट्स लिमिटेडने फ्लिपकार्टवर आगामी बिग बिलियन सेलसाठी 7,000 युनिट्सची मोठी ऑर्डर मिळवून आपली बाजारातील स्थिती मजबूत केली आहे. ज्याची किंमत जवळपास 10 मिलियन एवढी आहे.

महत्वाचे म्हणजे, मार्च 2024 पर्यंत, कंपनीच्या प्रमोटर्सकडे 51.54 टक्के एवढी हिस्सेदारी होती. FII कडे 0.77 टक्के, DII कडे 3.91 टक्के तर उर्वरित 43.78 टक्के हिस्सेदारी जनतेकडे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: investors rush to buy ₹35 cellecor gadgets limited share company gets big orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.