Join us

TATA च्या 'या' शेअरची गुंतवणूकदारांकडून धडाधड विक्री, एक्सपर्टही पडले बुचकळ्यात; बिझनेसवर आली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 11:10 AM

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव २ टक्क्यांहून अधिक घसरला.

Titan Share Price Update :  टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव २ टक्क्यांहून अधिक घसरला आणि किंमत ३२५७ रुपयांवर पोहोचली. व्यवहाराअंती हा शेअर ३२७० रुपयांवर होता. 

या वातावरणात टायटनला आता कोटक विश्लेषकांनी डाउनग्रेड केलं आहे. कोटकनं आधीच्या 'अॅड' रेटिंगवरून हा शेअर 'रिड्यूस' केला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना शेअर्सची संख्या कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये ११ टक्के घसरण झाली, त्या तुलनेत गेल्या वर्षभरात हा शेअर जवळपास ६ टक्क्यांनी वधारला आहे.

टायटनच्या शेअरची प्राईज

ब्रोकरेज कंपनीने टायटन कंपनीच्या शेअरचं टार्गेट प्राइस ३६०० रुपयांवरून ३०७५ रुपयांपर्यंत कमी केलं आहे. कोटक यांच्या मते, टायटनला विविध आघाड्यांवर मार्जिनच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यासह, ब्रोकरेजनं २०२५ ते २०२७ या आर्थिक वर्षांपर्यंत प्रति शेअर उत्पन्नाच्या अंदाजात ५-६% कपात केली आहे.

जून तिमाहीत ६१ नवे स्टोअर्स

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टायटनच्या उत्पन्नात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या कंपनीनं एप्रिल ते जून या तिमाहीत ६१ नवीन स्टोअर्स उघडले आहेत. त्यामुळे दुकानांची एकूण संख्या ३,०९६ झाली. टायटनच्या एकूण व्यवसायात ज्वेलरी कॅटेगरीचा वाटा सुमारे तीन चतुर्थांश आहे. या तिमाहीत या श्रेणीतील देशांतर्गत बाजारपेठेत नऊ टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीने ३४ दागिन्यांची स्टोअर्स उघडली आहेत.

काय म्हटलं कंपनीनं?

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या वर्षाच्या तुलनेच याच समान कालावधीत (तनिष्क) विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे. परंतु सोन्याच्या वाढत्या किंमती आणि त्यात सातत्यानं होत असलेली वाढ यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे. विवाहाचे मुहूर्त कमी असल्याचाही परिणाम झाल्याचं कंपनीनं म्हटलं.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारटाटा