IPO Allotment Trick : शेअर बाजारात आयपीओकडे पैसे कमवण्याची संधी म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे नवीन आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडतात. गेल्या आठवड्यात आलेल्या बजाज फायनन्स आणि पीएनजी ज्वेलर्सच्या आयपीओने अपेक्षाहून जास्त परतावा दिला आहे. आता पुढील आठवड्यात पुन्हा एकदा अशी संधी आली आहे. ५ दिवसात तब्बल ११ आयपीओ बाजारात लाँच केले जात आहेत. IPO मध्ये शेअर्स अलॉट होत नसल्याची तक्रार बहुतेक किरकोळ गुंतवणूकदार करतात. तुमचीही हीच समस्या असेल तर काळजी करू नका. आयपीओमध्ये शेअर्स मिळवण्यासाठी गुंतवणूकदार वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. तुम्हीही ही युक्ती वापरू शकता.
किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओ मिळवण्यात अडचण
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदार आयपीओमध्ये शेअर्स मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी शेअरहोल्डरच्या कॅटेगरीवर लक्ष केंद्रित करत आहेत. वास्तविक, आधीच बाजारात लिस्टेड असलेल्या अनेक कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांचे IPO लाँच करत आहेत. उदाहरणार्थ, बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ नुकताच लाँच झाला तर टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ काही काळापूर्वी लाँच झाला होता. बजाज समुहातील बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह आधीच बाजारात लिस्टेड आहेत. तर टाटा समूहाच्या टीसीएससह अनेक कंपन्या बाजारात आधीपासूनच आहेत.
शेअरहोल्डरसाठी राखीव श्रेणी
अशा IPO मध्ये समूह कंपन्यांच्या शेअरहोल्डरसाठी एक भाग राखीव असतो. याचा अर्थ, ते राखीव शेअर्स अशा गुंतवणूकदारांसाठी आहेत ज्यांच्याकडे आधीच समूह कंपन्यांचे शेअर्स आहेत. बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओमध्येही हे दिसून आले. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार पहिल्यांदा लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यांची नावे शेअरहोल्डरच्या नोंदीमध्ये नोंदवतात. त्यानंतर ते शेअरहोल्डरच्या श्रेणीत आयपीओसाठी अर्ज करत आहेत.
आयपीओवर किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या
अशा परिस्थितीत आयपीओमध्ये शेअर्स मिळण्याची शक्यता खरोखरच वाढते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजकाल असे दिसून येते की कोणताही चांगला IPO उघडल्यानंतर काही तासांतच किरकोळ गुंतवणूकदारांची कॅटेगरी पूर्णपणे भरून जाते. अनेकवेळा 3 दिवसात कैकपटीने बोली वाढत जाते. अशावेळी लॉटरी पद्धतीने शेअर्सचे वाटप केले जाते.
अशा प्रकारे वाढते शेअर्स मिळण्याची शक्यता
शेअरहोल्डरची कॅटेगरी देखील ओव्हरसबस्क्राइब होते. परंतु, रिटेल श्रेणीच्या तुलनेत तिथे कमी गर्दी आहे. वास्तविक हे सर्व IPO मध्ये होईलच असे नाही. उदाहरणार्थ, बजाज हाऊसिंगच्या IPO मध्ये, किरकोळ श्रेणी 7.41 पट सबस्क्राइब झाली होती. तर शेअरहोल्डर्स श्रेणी 18.54 पट सबस्क्राइब झालेली. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार किरकोळ आणि भागधारक अशा दोन्ही श्रेणींमध्ये पैसे गुंतवून त्यांच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.