Join us

₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:50 PM

KP Green Engineering share: शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी मंगळवारी 'या' शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या.

KP Green Engineering share: शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी मंगळवारी केपी ग्रीन इंजिनीअरिंगच्या शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. बीएसईवर सलग चौथ्या दिवशी या शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि भाव ६१९.८५ रुपयांवर पोहोचला. शेअरचा हा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. केपी ग्रीनचा शेअर गेल्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये २२ टक्क्यांनी वधारलाय. एसएमई समूहातील कंपनीचा शेअर २२ मार्च २०२४ रोजी लिस्टिंग झाल्यापासून उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होता.  

३३० टक्क्यांचा रिटर्न 

सध्या या शेअरनं १४४ रुपये प्रति शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ३३० टक्के परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरात शेअरच्या किंमतीत १०० टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीच्या निकालानंतर ही तेजी आली आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या सहामाहीत (H1FY24) २४.२० कोटी रुपयांचा नफा कमावलाय. कामकाजातून मिळणारं उत्पन्न ३६५.७ टक्क्यांनी वाढून २४५.१२ कोटी रुपयांवर पोहोचलं, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ५२.६४ कोटी रुपये होतं. 

कंपनीबद्दल माहिती 

केपी ग्रीन इंजिनीअरिंग हा गुजरातमधील केपी ग्रुपचा एक भाग आहे. याचे संस्थापक डॉ. फारुखभाई गुलामभाई पटेल आहेत. केपी समूहानं फॅब्रिकेशन आणि गॅल्व्हनाइजिंग, रिन्यूएबल एनर्जी (सोलर आणि विंड), दूरसंचार पायाभूत सुविधा (टेलिकॉम टॉवर्स आणि ओएफसी नेटवर्क सेटअप) आणि ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रात वर्चस्व निर्माण केलंय. 

कंपनी ट्रान्समिशन लाइन स्ट्रक्चर, विंडमिल स्ट्रक्चर, आयसोलेटर, टेलिकॉम टॉवर्स, सबस्टेशन आणि स्विचयार्ड स्ट्रक्चर्स, सोलर मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर, केबल ट्रे, अर्थिंग स्ट्रिप्स, पोल स्ट्रक्चर, रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन, फॅब्रिकेशन ऑफ ऑपरेशन आणि हॉट-डिप गॅल्व्हनाइजिंगच्या व्यवसायात आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग