Join us

IPO नं केलं मालामाल, ₹११३ वर झाला लिस्ट; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:30 AM

कंपनीचा आयपीओ आज 18 मार्च रोजी NSE वर लिस्ट झाला. या एसएमई आयपीओनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली.

Pratham EPC Projects IPO Listing Today: प्रथम ईपीसी प्रोजेक्टचा आयपीओ आज 18 मार्च रोजी NSE वर लिस्ट झाला. या एसएमई आयपीओनं (SME IPO) शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. कंपनीचे शेअर्स 51 टक्क्यांच्या प्रीमियमसह 113 रुपयांवर लिस्ट झाले. प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्स आयपीओची किंमत 75 रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीचा हा इश्यू 11-13 मार्च रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. कंपनीनं आयपीओद्वारे ₹36 कोटी उभारण्याची योजना आखली होती.  

किती झालेला सबस्क्राईब? 

या इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. प्रथम ईपीसी आयपीओ तीन दिवसात 178.54 पट सबस्क्राईब झाला होता. इश्यूचा प्राइस बँड ₹71 ते ₹75 प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. आयपीओ हा संपूर्णपणे 48 लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे आणि याची लॉट साईज 1600 शेअर्सची होती. किरकोळ गुंतवणूकदारांना यामध्ये किमान ₹120,000 गुंतवाले लागणार होते. 

काय आहे अधिक माहिती? 

आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनी मशीनरीची खरेदी करण्यासाठी, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्स आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आहेत. प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्सचे रजिस्ट्रार हे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार