Join us

IPO: केवळ १४१३० रुपये गुंतवा आणि बंपर फायदा मिळवा, १४ ते १६ सप्टेंबरपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 5:56 PM

IPO News: जर तुम्हीही येणाऱ्या काही दिवसांत शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचा प्लँन करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर बातमी आहे. गेल्या काही काळामध्ये एका आयपीओने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे.

मुंबई - जर तुम्हीही येणाऱ्या काही दिवसांत शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचा प्लँन करत असाल तर ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर बातमी आहे. गेल्या काही काळामध्ये एका आयपीओने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. या आयपीओमध्ये केवळ १४ हजार १३० रुपये गुंतवून तुम्ही बंपर नफा कमवू शकता. जाणून घेऊयात कुठली कंपनी तुम्हाला कमाईची ही संधी उपलब्ध करून देणार आहे त्याबद्दल.

हर्षा इंजिनियर्स इंटरनँशनल लिमिटेडचा इनिशियल पब्लिक अॉफरिंग म्हणजे आयपीओ पुढील महिन्यात ओपन होणार आहे. तुम्ही या आयपीओला सब्स्क्राइब करून लिस्टिंग डे ला चांगला फायदा मिळवू शकता.या आयपीओबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.आयपीओ कधी ओपन होणार - १४ सप्टेंबर २०२२आयपीओ क्लोज कधी होणार - १६ सप्टेंबर २०२२किती असेल प्राईज बँड - ३१४-३३० रुपयेलॉट साईज - ४५किती करावी लागेल गुंतवणूक - १४ हजार १३० रुपयेइश्यू साइज ७५५ कोटी

कोण आहेत लीड मँनेजर्स या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि  एनएसई दोन्हीकडे लिस्ट होतील. त्याशिवाय ग्रे मार्केटमध्ये किमतीचा विचार केल्यास हर्षा इंजिनियर्सचे शेअर आयपीओ ग्रे मार्केटमध्ये तेजीत आहेत. अँक्सिस कँपिटल लिमिटेड, इक्विरस कँपिटल प्रा. लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड इश्यूचे बुक रनिंग लीड मँनेजर आहेत.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार