Join us

IPO Market in August: ऑगस्ट महिना IPO मार्केटसाठी ठरला जबरदस्त; २७ महिन्यांचा दिला 'बेस्ट परफॉर्मन्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:04 PM

IPO Market: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी विविध क्षेत्रातील कंपन्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) लॉन्च करून निधी उभा करत आहेत.

IPO Market: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी विविध क्षेत्रातील कंपन्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) लॉन्च करून निधी उभा करत आहेत. ऑगस्टमध्ये आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारण्यात मोठी तेजी आली आहे आणि हे २७ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेय.

ऑगस्टमध्ये किमान १० कंपन्यांनी मिळून आयपीओच्या माध्यमातून १७,०४८ कोटी रुपये उभे केले. मे २०२२ नंतरची ही सर्वाधिक रक्कम आहे. याशिवाय ऑगस्टमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेपैकी सुमारे ५७ टक्के रक्कम फ्रेश इश्यूशी संबंधित आहे. आकडेवारीनुसार, सुमारे ९,७१५ कोटी रुपये फ्रेश इश्यूमधून उभे केले गेले, तर उर्वरित ७,३३३ कोटी रुपये ऑफर फॉर सेलमधून (ओएफएस) जमा झाले.

काय आहे तेजीचं कारण?

मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादादरम्यान तज्ज्ञांनी आयपीओतील तेजीचं कारण मजबूत आर्थिक विकास, भारतीय शेअर बाजाराचं वर्चस्व आणि कंपन्यांची वाढती कमाई असल्याचं म्हटलं. ही काही कारणं आहेत, ज्यांनी कंपन्यांना लिस्टिंगसाठी प्रोत्साहित केलं.

काय म्हणाले एक्सपर्ट?

"हाय लिक्विडिटी, सेकंडरी मार्केट परफॉर्मन्ससोबतच आयपीओचं मजबूत लिस्टिंग परफॉर्मन्स आयपीओमध्ये भाग घेण्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवत आहे. बहुतांश इश्यूंमद्ये उत्तम सबस्क्रिप्शन डिमांड दिसून आली. यानंतर लिस्टिंगचा फायदाही झाला. यामुळे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांना पैसे उभे करणं आणि गुंतवणूक करण्याचा विश्वास मिळाला," अशी प्रतिक्रिया मेहता इक्विटीजचे सीनिअर व्हीपी-रिसर्च अॅनालिस्ट प्रशांत तापसे यांनी दिली.

ऑगस्टमध्ये आलेले मोठे आयपीओ

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं ऑगस्टमध्ये आयपीओच्या माध्यमातून सुमारे ६,१४५ कोटी रुपये उभे केले. त्या खालोखाल ब्रेनबिझ सोल्यूशन्सनं ४,१९३ कोटी रुपये आणि प्रीमियर एनर्जीनं २,८३० कोटी रुपये कमावले. याशिवाय सीगल इंडिया (१,२५३ कोटी), बझार स्टाइल रिटेल (८३५ कोटी), ईसीओएस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी (६०० कोटी) आणि इंटरआर्क बिल्डिंग प्रॉडक्ट्स (६०० कोटी) हे आयपीओ या रेसमध्ये आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार