Join us  

टाटा टेक्नॉलॉजीजसह ५ कंपन्यांचे IPO गुंतवणूकीसाठी खुले, जाणून घ्या प्राईज बँडसह सर्व डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 1:14 PM

आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनेक संधी घेऊन आला आहे.

IPO News Updates: आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनेक संधी घेऊन आला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) सोबत, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रिज (Flair Writing Industries Limited), फेड बँक फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (Fed Bank Financial Services Limited), गंधार ऑईल रिफायनरी इंडिया लिमिटेड (Gandhar Oil Refinery India Limited) आणि इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (Indian Renewable Energy Development Agency Limited) यांचा आयपीओ खुला झाला आहे.

फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रिज लिमिटेड (Flair Writing Industries Ltd)प्राईज बँड - २८८ रुपये ते ३०४ रुपये प्रति शेअरलॉट साईज - ४९ शेअर्सलिस्टिंग - कंपनीचं लिस्टिंग बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी होईल

फेड फायनान्शिअल सर्व्हिसेस आयपीओ (Fedbank Financial Services Ltd)प्राईज बँड - १३३ रुपये ते १४० रुपये प्रति शेअरलॉट साईज - १०७ शेअर्सलिस्टिंग - कंपनीचं लिस्टिंग बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी होईलआयपीओ तारीख - २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर

गांधार ऑईल रिफायनरी इंडिया आयपीओ (Gandhar Oil Refinery India Ltd)प्राईज बँड - १६० रुपये ते १६९ रुपये प्रति शेअरलॉट साईज - ८८ शेअर्सआयपीओ तारीख - २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर

इंडियन रिन्यूएबल एनर्जी आयपीओ (IREDA IPO)प्राईज बँड - ३० रुपये ते ३२ रुपये प्रति शेअरलॉट साईज - ४६० शेअर्सआयपीओ तारीख - २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर

टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ (Tata Technologies Ltd IPO)प्राईज बँड - ४७५ रुपये ते ५०० रुपयेलॉट साईज - ३० शेअर्सआयपीओ तारीख - २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर लिस्टिंग - कंपनीचं लिस्टिंग बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी होईल

(टीप - यामध्ये आयपीओ संदर्भात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार