Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकीची मोठी संधी; एकाच वेळी येताहेत 4 IPO, पैसे लावण्यापूर्वी जाणून घ्या डिटेल्स...

गुंतवणूकीची मोठी संधी; एकाच वेळी येताहेत 4 IPO, पैसे लावण्यापूर्वी जाणून घ्या डिटेल्स...

IPO Updates : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल, तर या आठवड्यात चार IPO येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 03:32 PM2024-01-08T15:32:31+5:302024-01-08T15:32:48+5:30

IPO Updates : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल, तर या आठवड्यात चार IPO येत आहेत.

IPO Updates : Big Investment Opportunity; 4 IPOs Coming, Know Details Before Investing | गुंतवणूकीची मोठी संधी; एकाच वेळी येताहेत 4 IPO, पैसे लावण्यापूर्वी जाणून घ्या डिटेल्स...

गुंतवणूकीची मोठी संधी; एकाच वेळी येताहेत 4 IPO, पैसे लावण्यापूर्वी जाणून घ्या डिटेल्स...

नवी दिल्ली: गेल्या वर्षी अनेक कंपन्यांच्यां IPO ने गुंतवणूकदारांना मालामाल केले. 2024 मध्येही अशाच प्रकारचे अनेक IPO येणार आहेत. तुम्हीदेखील IPO मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. या आठवड्यात 4 नवीन IPO बाजारात येत आहेत. 

या चार आयपीओमध्ये ज्योती सीएनसी ऑटोमेशन, आयबीएल फायनान्स, न्यू स्वान मल्टीटेक आणि ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर, या नावांचा समावेश आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या चारही IPO ध्ये पैसे गुंतवायचे की, काही निवडक आयपीओमध्येच पैसे गुंतवायचे? यापूर्वी असे अनेक आयपीओ आले, जे येण्यापूर्वी खूप गाजले, पण गुंतवणूकदारांची निराशा झाली. आम्ही तुम्हाला या आयपीओबद्दल माहिती देणार आहोत.

ज्योती CNC ऑटोमेशन IPO
ज्योती CNC ऑटोमेशनचा IPO 9 ते 11 जानेवारी दरम्यान खुला होईल. याची किंमत 315-331 रुपये ठेवण्यात आली आहे. लॉट साइट 45 शेअर्सची आहे. 8 जानेवारीला त्याची जीएमपी 80 रुपये आहे. म्हणजे हा GMP कायम राहिल्यास प्रत्येक शेअरवर 80 रुपये नफा मिळण्याची शक्यता आहे. या प्रीमियमचा विचार करून या IPO साठी अर्ज करावा. 

IBL Finance IPO
IBL हा लघु आणि मध्यम उद्योग आहे. त्याच्या IPO ला SEM IPO म्हणतात. यासाठी तुम्ही 9 ते 11 तारखेदरम्यान अर्ज करू शकता. गुंतवणूकदारांना 1,02,000 रुपयांची बोली लावावी लागेल. याची किंमत 51 रुपये आहे तर लॉट साइज 2000 शेअर्स आहे. कंपनीला या IPO द्वारे 33.4 कोटी रुपये उभे करायचे आहेत. सध्या या कंपनीच्या IPO वर कोणताही प्रीमियम नाही. 

न्यू स्वान मल्टीटेक IPO
न्यू स्वान मल्टीटेकचा आयपीओ 11 जानेवारीला उघडेल आणि 15 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. इंजीनिअरिंग प्रोडक्टचे उत्पादन करणार्‍या SME कंपनीचा लॉट साइज 2000 शेअर्स असून, याची किंमत ₹62 ते ₹66 प्रति शेअर असेल. 

ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आयपीओ
ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर (इंडिया) चा IPO देखील 11 ते 15 जानेवारी दरम्यान ओपन होईल. कंपनीने 28 कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू आणला असून, याची किंमत 51-54 रुपयांच्या दरम्यान आहे. हा IPO सुद्धा SME श्रेणीचा आहे. किरकोळ गुंतवणूकदार 1 लॉट किंवा 2000 शेअर्ससाठी अर्ज करू शकतील.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: IPO Updates : Big Investment Opportunity; 4 IPOs Coming, Know Details Before Investing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.