Upcoming IPO : एनटीपीसी ग्रीन आणि ओलाच्या आयपीओच्या यशानंतर नवीन वर्षात अनेक नवे आयपीओ येण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, मणप्पुरम फायनान्स, मुथूट फायनान्स, ब्रिगेड एंटरप्रायजेस, कॅनरा बँक आणि ग्रीव्हज कॉटन सह १२ हून अधिक कंपन्यांसह अनेक कंपन्या २०२५ मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहेत.
या कंपन्यांनी २०२५ मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून आपल्या भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी भांडवल उभारण्याच्या तयारीत आहेत. तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या कंपन्यांचे आयपीओ तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी देऊ शकतात.
आधी येऊ शकतात हे आयपीओ
ग्रीव्हज कॉटन आणि एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेस आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आघाडीवर आहेत. सोमवारी, २ डिसेंबर रोजी ग्रीव्हज कॉटनच्या संचालक मंडळानं ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी या उपकंपनीच्या आयपीओला मंजुरी दिली. एचडीएफसी बँकेची एनबीएफसी शाखा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसनं १ नोव्हेंबर रोजी १२५०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा सादर केला. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एनबीएफसी आयपीओ असेल.
बँकर्सच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा एखादी कंपनी आयपीओ आणते तेव्हा कंपनीला नफा होण्याची शक्यता जास्त असते. तसंच, आपल्या स्टॉकसाठी चांगली किंमत सेट करण्यासाठी फायदा होतो. एचएसबीसी इंडियाचे ग्लोबल बँकिंग हेड अमिताभ मल्होत्रा यांच्या मते, आयपीओमुळे उपकंपन्यांना भांडवल उभारणीस मदत होते.
उद्या येणार हा आयपीओ
एमराल्ड टायर उत्पादक आपल्या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ४९ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. ९ डिसेंबरला बंद होणाऱ्या या इश्यूची किंमत ९० ते ९५ रुपये प्रति शेअर आहे. एमराल्ड टायर उत्पादक विविध प्रकारच्या टायरचं उत्पादन, पुरवठा आणि सर्व्हिसिंगमध्ये अग्रेसर आहेत. कंपनी आपली उत्पादनं ग्रेकस्टर ब्रँड नावानं विकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)