Join us  

कमाईची मोठी संधी आली; या आठवड्यात येणार अनेक IPO, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 6:47 PM

Upcoming IPO: तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर कमाईची मोठी संधी आली आहे.

Upcoming IPO: 2023 हे वर्ष IPO मार्केटसाठी उत्तम ठरत आहे. अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले आहेत. IPO च्या माध्यमातून तुम्हालाही नफा मिळवायचा असेल, तर एक चांगली संधी आली आहे. 11 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात 7 IPO येणार आहेत. यात पैसे गुंतवणूक तुम्ही चांगली कमाई करू शकता. 

India Shelter Finance Corporation Limitedहाऊसिंग फायनान्स कंपनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा (India Shelter Finance Corporation Limited) IPO 13 डिसेंबर रोजी उघडेल आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. इश्यू साईज 1200 कोटी रुपये आहे. IPO मध्ये 800 कोटी रुपयांचे 1.62 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील आणि 0.81 कोटी शेअर्ससह 400 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर (OFS) असेल. या IPO ची किंमत 469-493 रुपये प्रति शेअर आहे.

Doms Industriesस्टेशनरी आणि आर्ट प्रोडक्ट्स बनवारी कंपनी डोम्स इंडस्ट्रीजच्या आयपीओसाठी प्राइस बँड 750-790 रुपये प्रति शेअर आहे. 1200 कोटी रुपयांचा हा आयपीओ 13 डिसेंबर रोजी सुरू आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल.

SME सेगमेंटमध्ये 4 आयपीओ येणार-

SJ Logistics (India) Limited-हा आयपीओ 12 डिसेंबरला उघडेल आणि 14 डिसेंबरला बंद होईल. इश्यूमध्ये 38.4 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. या इश्यूची किंमत 121-125 रुपये प्रति शेअर आहे.

Presstonic Engineering Limited-हा आयपीओ 11 डिसेंबरला उघडेल आणि 13 डिसेंबरला बंद होईल. IPO चा आकार 23.30 कोटी रुपये आहे आणि किंमत रुपये 72 प्रति शेअर आहे.

Shree OSFM E-Mobility Limited-हा IPO 14 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 18 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO चा आकार 24.60 कोटी रुपये आहे. याची किंमत 65 रुपये प्रति शेअर आहे.

Siyaram Recycling Industries-हा IPO 14 डिसेंबरला उघडेल आणि 18 डिसेंबरला बंद होईल. इश्यूची किंमत 43-46 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक