Lokmat Money >शेअर बाजार > Iran vs Israel: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार दबावात; भारतावर काय होईल परिणाम?

Iran vs Israel: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार दबावात; भारतावर काय होईल परिणाम?

Iran vs Israel: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणाने जगभरातील बहुतांश शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. , युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:26 PM2024-10-02T13:26:16+5:302024-10-02T13:27:31+5:30

Iran vs Israel: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणाने जगभरातील बहुतांश शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. , युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे.

iran vs israel global stock market slide oil extends gains but this stock market gains | Iran vs Israel: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार दबावात; भारतावर काय होईल परिणाम?

Iran vs Israel: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार दबावात; भारतावर काय होईल परिणाम?

Iran vs Israel : 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. मात्र, आता दोघांच्या वादात तिसऱ्याचं नुकसान होताना पाहायला मिळतंय. इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणाने जगभरातील बहुतांश शेअर बाजार दबावात आले आहेत. युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे. तर आशियातील चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरच्या बाजारात खरेदीचे वातावरण होते. इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेत आहेत. अशा स्थितीत भारतीय गुंतवणूकदार काय करतायेत? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागल्यामुळे युद्धाचे सावट गडद झाले आहेत. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. पुरवठ्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे.

गुंतवणूकदारांची सोने आणि रोख्यांना पसंती
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी पडल्याने गुंतवणूकदार घाईघाईत स्टॉक विकत आहे. तर दुसरीकडे सुरक्षित पर्यायांवर उड्या पडत आहे. यामुळे यूएस ट्रेझरी बाँडचे उत्पन्न घसरत असून सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलर या अमेरिकन चलनाने युरोच्या तुलनेत ३ आठवड्यांत सर्वात मजबूत पातळी गाठली आहे.

ट्रेंड काय सांगतोय?
मॅक्रो इकॉनॉमिक्सने डॉलरला पाठिंबा दिला आहे. याशिवाय अमेरिकेतील मजबूत जॉब मार्केटमुळे नोव्हेंबरमध्येही यूएस फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, या महिन्यात युरो झोनमधील चलनवाढीच्या स्थितीने युरोपियन सेंट्रल बँकेच्या थंडपणाचे समर्थन केले. पेपरस्टोनचे संशोधन प्रमुख ख्रिस वेस्टन म्हणतात, की सध्या बाजारात बरीच अस्थिरता आहे. अर्थशास्त्र, कॉर्पोरेट कमाई आणि मध्यवर्ती बँकांवर युद्धाचं वर्चस्व राहू  शकते. इराण आणि इस्रायलच्या प्रत्येक भूमिकेचा जगभरातील अर्थशास्त्रवर परिणाम करणार आहे. 

भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?
कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे परिणाम भारतातही होऊ शकतात. कच्चे तेल महागल्याने तेल वितरक कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराण इस्रायल संघर्षामुळे भारतीयांना आर्थिक झळ बसू शकते.

Web Title: iran vs israel global stock market slide oil extends gains but this stock market gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.