Join us

'या' सरकारी कंपनीमुळे अवघ्या दोन आठवड्यात गुंतवणुकदार मालामाल, १ लाखाचे झाले ४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 6:33 PM

आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. त्यात २ आठवड्यात एका कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले

Stock Market IRDAI : पंतप्रधान मोदी यांनी या वर्षी संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते की, जेव्हा विरोधी पक्षाचे नेतेमंडळी सरकार आणि सरकारी कंपनीला शिव्या घालू लागतात, तेव्हा तुम्ही त्यात पैसे गुंतवा, त्यातून नक्कीच फायदा होणार. तेव्हापासून शेअर बाजारात काही सूचिबद्ध झालेल्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स बघितले तर त्यात थोडेस तथ्य जाणवेल. कारण गेल्या काही काळापासून सरकारी कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना वेगाने नफा मिळवून देताना दिसत आहेत. नुकताच एका सरकारी कंपनीचा IPO आला. बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चौपट परतावा दिला आहे. जाणून घ्या त्याबद्दल...

1 लाखाचे झाले 4 लाख

IPO लाँच झाल्यापासून सरकारी कंपनी IRDAI ने आपल्या गुंतवणूकदारांना 4 पट परतावा दिला आहे. त्याचा IPO 30-32 रुपयांच्या प्राइस बँडवर ऑफर करण्यात आला होता. जेव्हा ते बाजारात सूचीबद्ध झाले तेव्हा ते त्यांच्या प्रीमियमपेक्षा 56 टक्के अधिक होते. आकड्यांवर नजर टाकली तर या कंपनीच्या एका शेअरची किंमत 50 रुपये होती. आज तो 120 रुपयांच्याही पुढे गेला आहे. यामध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम आज तब्बल 4 लाख रुपये झाली आहे.

कंपनीने सुरूवातीला 'इतका' पैसा उभा केला!

२० नोव्हेंबर रोजी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी आपला IPO उघडला, ज्यामध्ये कंपनीने 643.26 कोटी रुपये उभे केले. यामध्ये 40,31,64,706 फ्रेश इक्विटी आणि 26,87,76,471 इक्विटी ऑफर फॉर सेलचा समावेश होता. बीएसई नुसार, तिसऱ्या दिवशी हा IPO 9.80 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीने या IPO साठी QIB साठी 50%, NII साठी 15% आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35% राखीव ठेवले होते.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक