Lokmat Money >शेअर बाजार > बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावतोय हा रेल्वेचा शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; किंमत ₹२०० पेक्षा कमी

बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावतोय हा रेल्वेचा शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; किंमत ₹२०० पेक्षा कमी

IRFC Share price: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या शेअर्सची मोठी चर्चा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:57 AM2024-01-20T10:57:18+5:302024-01-20T10:57:51+5:30

IRFC Share price: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या शेअर्सची मोठी चर्चा होत आहे.

IRFC Share price hit 52 week high Price less than rs 200 investors huge profit bse nse ram mandir Saturday market | बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावतोय हा रेल्वेचा शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; किंमत ₹२०० पेक्षा कमी

बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावतोय हा रेल्वेचा शेअर, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; किंमत ₹२०० पेक्षा कमी

IRFC Share price: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या शेअर्सची मोठी चर्चा होत आहे. या शेअर्समध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरचाही समावेश आहे. शुक्रवारचा दिवस कंपनीसाठी खूप खास हा ठरला. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​मार्केट कॅप २ लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. तर शनिवारीही कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची तेजी दिसून आली. 

५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर

शुक्रवारी कामकाजाच्या सुरूवातीला कंपनीचे शेअर्स बीएसईवर १४९.४० रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काही वेळाने तो १६०.८० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. दरम्यान, शुक्रवारी कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटींच्या वर गेलं. शनिवारीही या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आणि शेअर २०.५१ टक्क्यांच्या उसळीसह १७६.२५ रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे.

महिन्याभरात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसू आली आहे. २० डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ९४.४५ रुपयांच्या पातळीवर होते. परंतु २० जानेवारी २०२४ रोजी कंपनीच्या शेअर्सनं १७६.२५ रुपयांची पातळी गाठली.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IRFC Share price hit 52 week high Price less than rs 200 investors huge profit bse nse ram mandir Saturday market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.