Adani Group News: गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. ग्रुपचे सर्व दहा शेअर्स ग्रीन झोनमध्ये आले आहेत. सोमवारी(दि.9) इस्रायल-हमास युद्धामुळे ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठा डाउनफॉल पाहायला मिळाला होता. पण, आज शेअर्सने 3 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली.
इस्रायल-हमास युद्धामुळे शेअर्सवर परिणामइस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा अदानी ग्रुपवर मोठा परिणाम झाला. याचे कारण म्हणजे, इस्रायलमधील सर्वात मोठे हैफा बंदर, अदानी समूहाच्या मालकीचे आहे. युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट वाढल्याने शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी घसरले होते. यानंतर कंपनीने निवेदन जारी करुन सांगितले की, हैफा बंदर इस्रायलच्या उत्तर भागात आहे, तर युद्ध दक्षिण भागात सुरू आहे. आज शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांनी वाढ झाली.
अदानी स्टॉक्सची स्थिती...अदानी पोर्ट्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीच्या एकूण मालवाहतुकीमध्ये हैफा पोर्टचा वाटा केवळ 3 टक्के आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत, अदानी पोर्ट्सला एकूण मालवाहतूक 203 मिलियन मेट्रिक टन होती, ज्यामध्ये हैफाचा वाटा फक्त 60 लाख मेट्रिक टन होता. यामुळे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
(टीप- आम्ही फक्त शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)