Join us

इस्रायल-हमास संघर्षाचा भारतावर परिणाम; अवघ्या 2 तासात 2.42 लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:52 PM

Israel-Palestine War: इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे.

Israel-Palestine War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना 'हमास'मध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. या संघर्षाचा परिणाम भारतीयशेअर बाजारावरही दिसून येत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात डाउनफॉल पाहायला मिळाला. सोमवारी सुरुवातीच्या सत्रात BSE सेन्सेक्स 407.19 अंकांनी घसरुन 65,588.44 वर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 142.70 अंकांच्या घसरणीसह 19,510.80 अंकांवर आला.

शेअर बाजारातील या घसरणीमुळे सुरुवातीच्या सत्रात बीएसईचे मार्केट कॅप 2.42 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. विशेष म्हणजे, शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3,19,86,272.55 रुपये होते. सोमवारी सकाळी 9.15 ते 11, या वेळेत सुमारे 2.42 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

गुंतवणूकदारांमध्ये घबराटतज्ज्ञांच्या मते इस्रायल-हमास संघर्षामुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. गुंतवणूकदारही जोखीम घेणे टाळत आहेत. आज बाजारात ज्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे, त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, टायटन, इंडसइंड बँक आणि एशियन पेंट्स, या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि सन फार्माचे शेअर्स नफ्यात व्यवहार करत आहेत.

आशियाई बाजारांवरही परिणाम पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ भारतीय बाजारावरच नाही, तर इतर आशियाई बाजारांवरही दिसून आला. इतर आशियाई बाजारांमध्येही डाउनफॉल दिसून येत आहे. शुक्रवारी युरोपीय बाजार आणि अमेरिकन बाजारही नफ्यात होता. आज हे बाजार उघडतील, तेव्हा तिथे काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल. 

टॅग्स :इस्रायल - हमास युद्धइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षभारतइस्रायलशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकपैसा