Join us  

या IT कंपनीला मिळाली ₹64192000 ची ऑर्डर; वर्षभरात शेअरने दिला 340% परतावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 4:41 PM

IT Stocks: आयटी कंपनीला उद्योग विभाग महाराष्ट्र (MIDC) कडून ही ऑर्डर मिळाली आहे.

IT Stocks : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. कॉम्प्यूटर-सॉफ्टवेअर अँड कंसल्टिंग कंपनी Ceinsys Tech ला या होळीच्या दिवशी गुड न्यूज मिळाली. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या आयटी कंपनीला एमआयडीसी (MIDC) कडून 6,41,92,000 रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे, हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने फक्त 6 महिन्यात 180 टक्के दगडे रिटर्न्स दिले आहेत.

ऑर्डर डिटेल्स...कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला 23 मार्च 2024 रोजी ऑटोकॅडच्या पुरवठ्यासाठी उद्योग विभाग महाराष्ट्र (MIDC) कडून ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच कंपनी  AutoCAD अपग्रेड, व्यवस्थापन आणि 100 नवीन मल्टी-युजर लायसेन्सटी ऑर्डरही मिळाली आहे. ही ऑर्डर 3 वर्षात पूर्ण करायची आहे. या वर्क ऑर्डरचे एकूण मूल्य 6,41,92,000 रुपये आहे.

Ceinsys Tech शेअरची कामगिरीCeinsys Tech एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअरने एका वर्षात 340 टक्के दमदार रिटर्न्स दिला आहे. तर, 6 महिन्यात 180 आणि 3 महिन्यात 64 टक्के रिटर्न्स दिला आहे. आईटी कंपनी का मार्केट कैप 952.18 करोड़ रुपये है. स्टॉक का 52 वीक हाई 654.45 और लो 116.25 है. 22 मार्च को स्टॉक 582.75 के स्तर पर बंद हुआ.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक