Lokmat Money >शेअर बाजार > २९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

ITC Dividend Stock: कंपनीनं एका शेअरवर ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. या लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये. जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:00 IST2025-02-07T11:59:33+5:302025-02-07T12:00:20+5:30

ITC Dividend Stock: कंपनीनं एका शेअरवर ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. या लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये. जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

ITC company has paid dividends 29 times Now company will pay dividends again Do you have this stock | २९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

ITC Dividend Stock: लोकप्रिय एफएमसीजी कंपनी आयटीसीनं (ITC Dividend) चालू आर्थिक वर्षासाठी दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीनं एका शेअरवर ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. या लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये. जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर कंपनीचा शेअर ४४१.९५ रुपयांवर खुला झाला. यानंतर कंपनीचा शेअर ४३५.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

१ शेअरवर ६.५० रुपयांचा लाभांश

आयटीसीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार बोर्डाने १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरमागे ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट १२ फेब्रुवारी २०२५ ठेवण्यात आली आहे, असं कंपनीनं म्हटलंय. पुढच्या आठवड्यात बुधवारी ज्या गुंतवणूकदारांचं नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना लाभांश मिळणार आहे.

यापूर्वी कंपनीने मे महिन्यात या आर्थिक वर्षात एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार केला होता. त्यानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७.५० रुपये लाभांश दिला.

यापूर्वी २९ वेळा लाभांश

आयटीसीनं गुंतवणूकदारांना २००१ मध्ये पहिल्यांदा लाभांश दिला. गेल्या १२ महिन्यांत कंपनीनं प्रति शेअर १३.७५ रुपये लाभांश दिला होता. आयटीसीचं डिविडंड यील्ड ३.१२ टक्के आहे.

तिमाही निकाल कसे होते?

वार्षिक आधारावर आयटीसीच्या निव्वळ नफ्यात ७.२७ टक्क्यांची घट झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५०१३.१६ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ५४०६.५२ कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २०,३४९.९६ कोटी रुपये होता. उत्पन्नात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: ITC company has paid dividends 29 times Now company will pay dividends again Do you have this stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.