Join us

कंपनीला मिळाली ₹3290 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवमूकदारांची झुंबड; डिव्हिडेंडचीही घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 12:49 PM

बीएसईवर कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 249.40 रुपये तर निचांक 93.75 रुपये एवढा आहे. 

शेअर बाजारात ITD सिमेंटेशन इंडियाच्या (ITD Cementation India) शेअर प्राइसमध्ये आज 14 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर शुक्रवारी 14.66 टक्क्यांच्या वाढीसह 249.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मिळालेली 3290 रुपयांची वर्क ऑर्डर.

कोणत्या क्षेत्रात मिळालं काम -  आपल्याला 3290 कोटी रुपयांचा मरीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. ITD Cementation India ने शेअर बाजारासंदर्भातील ही माहिती 31 ऑगस्ट 2023 रोजी दिली. महत्वाचे म्हणजे, कंपनीने वर्क ऑर्डरसंदर्भातील सर्व माहिती अद्याप शेअर केलेली नाही. मात्र,  या वर्क ऑर्डरमुळे गुंतणूकदारांतील आत्मविश्वास वाढला आहे.

शेअर बाजारातील एका वर्षाचा कंपनीचा परफॉर्मन्स -गेल्या एका महिन्यात कंपनी कंपनीच्या शअर प्राइसमध्ये 30 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तर, 6 महिन्यांपूर्वी हा स्टॉक खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 143 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे. बीएसईवर कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 249.40 रुपये तर निचांक 93.75 रुपये एवढा आहे. 

डिव्हिडेंड देतेय कंपनी - कंपनी बोर्डाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंपनी आपल्या योग्य गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 0.75 रुपयांचा डिव्हिडेंड देत आहे. महत्वाचे म्हणजे हा डिव्हिडेंड कंपनी गेल्या आर्थिक वर्षासाठी देत आहे. मात्र अद्याप, डिव्हिडेंडसाठी तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक