Join us

ITI Share Price : BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 11:05 AM

ITI Share Price : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएलने आता देशातील ग्रामीण भागात आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. यामध्ये एका सरकारी कंपनीचं भाग्य उजाळलं आहे.

ITI Shares Rocket :सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएल सध्या फुल्ल फॉर्मात दिसत आहे. टाटा कंपनीने हातमिळवणी केल्यानंतर बीएसएनएलचे दिवसच बदलले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ६० लाखांहून अधिक ग्राहकांनी बीएसएनएलची सेवा निवडली आहे. याच BSNL मुळे आता आणखी एका सरकारी कंपनीचं भविष्य उजाळलं आहे. BSNL ने भारतनेट प्रकल्पाच्या मिडल-माईल नेटवर्कसाठी १६ सर्कलमध्ये निविदा मागवल्या होत्या. यामध्ये ITI कंपनीच्या नेतृत्वाखालील संघाने ११ पैकी २ टेंडर मिळवण्यात यश मिळवले आहे. या डिलनंतर ITI चे शेअर्स दोन दिवसांत रॉकेट झाले आहेत.

ITI च्या नेतृत्वाखालील संघाने २ राज्यांमध्ये BSNL च्या प्रकल्पांसाठी सर्वात कमी बोली लावून हे टेंडर मिळवलं आहे. एकूण ३ हजार २२ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स कंपनीला मिळाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निविदा पॅकेज ८ अंतर्गत हिमाचल प्रदेश आणि पॅकेज ९ साठी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेटांसाठी असल्याचे कंपनीने सांगितले.

ITI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश राय म्हणाले, "हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम, आणि अंदमान आणि निकोबार बेटे या राज्यांमधील प्रतिष्ठित भारतनेट फेज-३ प्रकल्पाचे टेंडर आम्हाला मिळाल्याचा आनंद होत आहे. भारतनेट हा एक राष्ट्रउभारणीचा प्रकल्प आहे. या महाकाय प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा एक भाग असल्याचे मला खूप समाधान मिळाले."

ITI-नेतृत्वाखालील संघ 4G नेटवर्कच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भारताला अखंडपणे जोडण्यासाठी केंद्राला मदत करत आहे. BharatNet III प्रकल्पाने खाजगी क्षेत्रातील तसेच सरकारी मालकीच्या उद्योगांमधून मोठ्या संख्येने बोलीदारांना आकर्षित केले आहे. 

ग्रामीण भागाला वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे लक्ष्य या वर्षाच्या सुरुवातीला भारतनेट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी बीएसएनएलने सुमारे ६५,००० कोटी रुपयांची निविदा काढली होती. भारतनेट प्रकल्पांतर्गत ग्रामीण इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या या टप्प्यात सर्व ६.४ लाख गावे, गट आणि ग्रामपंचायतींना हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :बीएसएनएलशेअर बाजारशेअर बाजार