Lokmat Money >शेअर बाजार > छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी!

छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी!

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 8 मे रोजी जय बालाजीचा शेअर 71.45 रुपयांवर होता. तो आज 617 रुपयांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:22 AM2023-11-07T11:22:35+5:302023-11-07T11:22:50+5:30

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 8 मे रोजी जय बालाजीचा शेअर 71.45 रुपयांवर होता. तो आज 617 रुपयांवर पोहोचला आहे.

jai balaji industries big miracle Returned 748 Percent in Just 6 Months | छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी!

छोट्या शेअरची मोठी कमाल, 748 टक्के परतावा दिला फक्त 6 माहिन्यात; गुंतवणूकदारांची दिवाळीत चांदी!

 
शेअर बाजारातील एका छोट्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. या शेअरने केवळ सहा महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 8.48 लाख रुपये केले आहे. हा शेअर आहे जय बालाजी इंडस्ट्रीजचा. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 8 मे रोजी जय बालाजीचा शेअर 71.45 रुपयांवर होता. तो आज 617 रुपयांवर पोहोचला आहे.

एका वर्षात 14 पट परतावा -
जय बालाजीच्या शेअर प्राइस हिस्ट्रीचा विचार करता, या शेअरने गेल्या 20 वर्षांत तब्बल 3583 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 4 जानेवारी 2008 रोजी हा शेअर 611.30 रुपयांवर पोहोचला होता. पुन्हा एकदा आपल्या सुवर्ण काळाकडे वाटचाल करत असलेल्या या शेअरने गेल्या पाच वर्षांत 3601 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 14 पट वाढवले ​​आहेत. या कालावधीत त्याने 1275 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 लाखहून अधिक - 
जय बालाजीच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 748 टक्क्यांचा परतावा देत मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये आपली जागा बनवली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार करत, या शेअरने एका महिन्यात सुमारे 20 टक्के परतावा दिला आहे. हा शेअर आजही 617.45 रुपयांवर खुला झाला. याचा 52 आठवड्यांतील उच्चांक 641.90 रुपये एवढा आहे. तर निचांक 39.05 रुपये एवढा आहे.

काय करते कंपनी - 
जय बालाजी समूह हा कॅप्टिव्ह पॉवर जनरेशनसह स्टील उत्पादन करतो. राणीगंज, लिलुआ आणि राउरकेलासह 9 ठिकाणी कंपनीचे प्लँट आहेत. तसेच, रघुनाथपूरमध्ये एक मेगा स्टील, सिमेंट आणि ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजनाही आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: jai balaji industries big miracle Returned 748 Percent in Just 6 Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.