शेअर बाजारात जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेडने (Jai Balaji Industries Ltd) गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या स्मॉल कॅप शेअरचा भाव 16 रुपयांवर 624 रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे.
शुक्रवारीही लागलं होतं अप्पर सर्किट -
ऑक्टोबर 2020 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव 15.95 रुपये होता. यानंतर, शुक्रवारी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागल्यानंतर, कंपनीचा शेअर 624.80 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 625.05 रुपये हा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 10,024.93 कोटी रुपये एवढे आहे.
गेल्या 6 महिन्यांत 1100 टक्क्यांहून अधिक परतावा -
जय बालाजी इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 1100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तसेच, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी कंपनीचे शेअर खरेदी केले होते आणि आतापर्यंत होल्ड करून ठेवले होते. त्यांना 1300 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा मिळाला आहे. गेल्या 1 महिन्याच्या काळातही या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)