शेअर बाजारातील जेपी समूहाची कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सच्या (JP Power Ventures) शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. जेपी पॉवरचा शेअर सोमवारी 20 टक्क्यांच्या तेजीसह 13.75 रुपयांवर पोहोचला आहे. जेपी पॉवरच्या शेअरचा हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीचा शेअर ऑल टाइम हायपेक्षा 99 टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 5.17 रुपये एवढा आहे.
137 रुपयांवरून 50 पैशांवर आला होता शेअर, आता 13च्याही वर पोहोचला -गेल्या काही वर्षांपासून जेपी पॉवरचा शेअर दबावात आहे. 4 जानेवारी 2008 रोजी कंपनीचा शेअर 137.10 रुपयांवर होता. जो 27 मार्च 2020 रोजी घसरण होत आणि 50 पैशांवर आला होता. मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनीच्या शेअरने चांगलाच जोर पकडला आहे. हा शेअर आता 13 रुपयांच्याही पुढे गेला आहे.
साडेतीन वर्षांत शेअरमध्ये 2640% तेजी -जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सच्या शेअरने गेल्या साडेतीन वर्षांत 2640 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 50 पैशांवर होता. जो 6 नोव्हेंबर 2023 रोजी 13.75 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत जेपी पॉवरच्या शेअरने 131 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर 78 टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या एका वर्षात जेपी पॉवरच्या शेअरमध्ये 79 टक्क्यांची तेजी आली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)