Join us  

Jamshri Realty Share Split : १०० भागांत स्प्लिट झाला 'हा' जबरदस्त स्टॉक; किंमत आली २५० रुपयांच्या खाली; ९० दिवसांत पैसे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 9:30 AM

Jamshri Realty Share Split : २४ जुलै रोजी कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १००० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची १०० भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Jamshri Realty Share Split : शेअर बाजारात चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी जामश्री रियल्टी ही एक कंपनी आहे. कंपनीचे शेअर्स १०० भागांमध्ये स्प्लिट करण्यात आला आहे. जामश्री रियल्टीच्या शेअरचा भाव २५० रुपयांवर आला आहे.

रेकॉर्ड डेट कधी होती?

२४ जुलै रोजी कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १००० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची १०० भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपयांपर्यंत खाली आली आहे. या शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट १६ ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली होती. 

शुक्रवारी लागलेलं अपर सर्किट

शेअर्सच्या स्प्लिटनंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत २५० रुपयांपेक्षा कमी झाली आहे. शुक्रवारी बीएसईमध्ये कंपनीच्या शेअरचा भाव २ टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचल्यानंतर २२८.७५ रुपयांवर पोहोचला. तर १४ ऑगस्ट रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट होते. तेव्हा कंपनीच्या शेअर्सची किंमत २२,४३०.६० रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. जामश्री रियल्टीच्या शेअर्समध्ये १२ ऑगस्टपासून अपर सर्किट पाहायला मिळत आहे. यानंतर सोमवारीही (१९ ऑगस्ट) कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं. 

कंपनीची जबरदस्त कामगिरी

गेल्या वर्षभरात या कंपनीनं जवळपास ५०० टक्के परतावा दिला आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत ३४१ टक्के नफा झाला आहे. या शेअरने केवळ ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्राताली जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक