जय कैलाश नमकीन (Jay Kailash Namkeen IPO) याची शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली होती. मात्र, कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच घसरले. जय कैलाश नमकीनचे शेअर्स 16 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 85 रुपयांना बाजारात लिस्ट झाले. आयपीओमध्ये, गुंतवणूकदारांना जय कैलाश नमकीनचे शेअर्स 73 रुपयांना मिळाले. कंपनीचा IPO 28 मार्च रोजी उघडण्यात आला आणि तो 3 एप्रिल 2024 पर्यंत खुला होता. जय कैलाश नमकीनच्या आपीओची एकूण साईज 11.93 कोटी रुपये होती.
यानंतर लगेचच जय कैलाश नमकीनच्या शेअर्सची घसरण झाली. कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 80.75 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअरने कामकाजादरम्यान 86.90 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 71.82 टक्के होता, जो आता 48.33 टक्क्यांवर आला आहे. जय कैलाश नमकीनची सुरुवात 2021 मध्ये झाली. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये चना जोर नमकीन, मसाला चना जोर, पुदीना चना, मसाला मूंग जोर, प्लेन मूंग जोर, सोया स्टिक्स, हळदी चना, चना डाळ यासारख्या नमकीनचा समावेश आहे. कंपनीचा प्लांट गुजरातमधील राजकोट येथे आहे आणि त्याची उत्पादन क्षमता दररोज 10 टन इतकी आहे.
40 पट सबस्क्राईब
जय कैलाश नमकीनचा आयपीओ एकूण 40.02 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 50.99 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या (NII) श्रेणीमध्ये आयपीओ 68.93 वेळा सबस्क्राइब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा (QIB) 2.32 पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉटसाठी अर्ज करू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 116800 रुपये गुंतवावे लागले.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)