Join us

मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 5:46 PM

JBM Auto Ltd Share: कंपनीच्या शेअरने आज 10.1% तर वर्षभरात 225% रिटर्न्स दिले आहेत.

JBM Auto Ltd Share: इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी जेबीएम ऑटो लिमिटेड(JBM Auto Ltd) साठी मंगळवारचा(दि.19) दिवस चांगला ठरला. एका दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 10.1% वाढ झाली. कंपनीच्या शेअर्सने इंट्राडे उच्चांक 2060.60 रुपये गाठला. कंपनीच्या शेअर्सच्या या वाढीमागे मोठे कारण आहे. कंपनीला 1,390 इलेक्ट्रिक बसेसाठी ₹7,500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. 

केंद्र सरकारकडून PM-eBus सेवा योजनेअंतर्गत JBM Auto ला 1,390 इलेक्ट्रिक बसेसशी संबंधित इलेक्ट्रिक आणि इन्फ्रा विकासासाठी ₹7,500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पीएम-ईबस सेवा योजना जाहीर केली होती. या अंतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) द्वारे 169 शहरांमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला जाणार आहे.

कंपनीने काय म्हटले?कंपनीने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना PM-eBus सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी, पुरवठा, संचालन, देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बस ऑपरेटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑर्डरचे एकूण मूल्य ₹7,500 कोटी रुपये असून, पुढील 12-18 महिन्यांत याचे काम सुरू केले जाईल. दरम्यान, कंपनीच्या शेअरने गेल्या 12 महिन्यांत गुंतवणुकदारांना दमदार 225% परतावा दिला आहे. तसेच, पाच वर्षांत हा स्टॉक 1,711.96% वाढला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइलेक्ट्रिक कार / स्कूटरकेंद्र सरकार