Join us  

झुनझुनवाला फॅमिलीचा छोट्या कंपनीवर बडा डाव, 35 टक्के स्वस्त शेअरमध्ये खरेदी केली मोठी हिस्सेदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 5:44 PM

Rekha Jhunjhunwala Portfolio Stock: ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस झुंनझुनवालांकडे, फर्ममध्ये 62,92,134 इक्विटी शेअर्स अथवा 1.94 टक्के हिस्सेदारी आहे.

दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत सन फार्मा अॅडव्हँस्ड रिसर्च कंपनी (Sun Pharma Advanced Research) मध्ये स्मॉलकॅपमध्ये 1.79% वाटा खरेदी केला आहे. ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस झुंनझुनवालांकडे, फर्ममध्ये 62,92,134 इक्विटी शेअर्स अथवा 1.94 टक्के हिस्सेदारी आहे.

20,097.7 कोटी रुपयांचे शेअर -कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, झुनझुनवाला यांच्याकडे अंदाजे 20,097.7 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या संपत्तीसह 21 स्टॉक्स आहेत. 2022 च्या डिसेंबर तिमाहीत त्यांनी जियोजित फाइनांशिअल, अॅप्टेक, केनरा बँक आणि एनसीसीसारख्या शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओतील इतर शेअर्समध्ये अर्थात सिंगर इंडिया, अॅग्रो टेक फूड्स, क्रिसिल, डीबी रियल्टी, Jubilant Pharmova, स्टार हेल्थ आणि Jubilant Ingrevia मध्येही हिस्सेदारी वाढवली आहे.

वर्षभरात 35% कोसळलाय शेअर -सन फार्मा अॅडव्हॉन्स्ड रिसर्च कंपनी गेल्या एका वर्षात 35% च्या नकारात्मक रिटर्नसह एक अंडरपरफॉर्मिंग स्टॉक आहे. गेल्या सहा मिहिन्यांत स्टॉकने 5 टक्क्यांचा निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. सकाळी 10.50 वाजता हा स्टॉक 1.3 टक्क्यांनी वाढून 209.6 रुपयांवर पोहोचला होता. यादरम्यान स्टॉक आपल्या 52-आठवड्यांतील खालच्या पातळीपासून 22 टक्के वरच्या पातळीवर आहे. 

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक