गेल्या काही सत्रांमध्ये शेअर बाजारात लार्ज आणि मिड-कॅप्समध्ये तेजी दिसून आली आहे. ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. या काळात ज्या कंपन्यांनी शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे, त्यात मेंट्रो ब्रँड्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सचाही समावेश आहे. रेखा झुनझुनवाला यांनी या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांना या दोन शेअर्समधून तब्बल ६५० कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
स्टार हेल्थने डिसेंबर २०२१ मध्ये शेअर बाजारात एन्ट्री केली होती. त्यानंतर रेखा झुनझुनवाला यांचे पती राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत १७.५० टक्के हिस्सा होता. म्हणजेच त्यांच्याकडे स्टार हेल्थचे १०,०७,५३,९३५ शेअर्स होते. पण राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर हे शेअर्स त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानुसार रेखा झुनझुनवाला यांची कंपनीतील हिस्सा १७.५० टक्के आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे एकूण ३,९१,५३,६०० शेअर्स होते. राकेश झुनझुनवाला यांनी आयपीओपूर्वीच या कंपनीत गुंतवणूक केली होती.
शेअरची किंमत वाढली
गेल्या एका महिन्यात स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरची किंमत ५३०.९५ रुपयांवरून ५७८.०५ रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, पोझिशनल गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ४७.१० रुपयांचा फायदा झाला आहे. रेखा झुनझुनवाली यांच्या कंपनीतील शेअरहोल्डिंगचा विचार करता त्यांनी या कंपनीतून ४७५ कोटी रुपये कमावले आहेत. दुसरीकडे, जर आपण मेट्रो ब्रँड्सबद्दल बोललो तर, गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर ४५.७० रुपयांनी वाढला आहे. यामुळे रेखा झुनझुनवाला यांना १ महिन्यात या स्टॉकमधून १७९ कोटी रुपये मिळाले आहेत. या दोन शेअर्सना एकत्र करून झुनझुनवाला यांनी ६५० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)